विमानप्रवासाचा संस्मरणीय प्रसंग
"यावर्षी इ.९वीत सर्वप्रथम आलेला विद्यार्थी आहे ,गाडे सुधीर शिवलिंग. पारितोषिक आहे पुणे ते मुंबई विमानप्रवास" साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग शाळेत शैक्षणिक वर्ष १९८६-८७ च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ही घोषणा झाली. अतिशय आनंद झाला होता. त्यावेळी विमानप्रवास ही अपूर्वाईचीच गोष्ट होती. साखरवाडीसारख्या छोट्या गावातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने तर अविस्मरणीय अनुभवच. मी कोणती बॅग घ्यायची, कोणते कपडे घ्यायचे याचे बेत ठरवायला सुरूवात केली. पण......
पण केवळ मला एकट्याला विमानाने पाठवायला कै.बापू आणि आई तयार नव्हते. सोबत कुणीतरी हवेच असा त्यांचा आग्रह होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. विमानप्रवासाचा अनुभव घ्यायची इच्छा तेव्हापासून मनात घर करून राहिली होती. पण म्हणतात ना योग यावा लागतो. तो योग आज आला. आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि संस्थेचा इतिहास ग्रंथ 'ध्यासपंथे चालता' याचे प्रकाशन दिल्लीतील मान्यवरांच्या हस्ते व्हावे यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न चालू होते. रविवार ६ फेब्रुवारी २०२२ यादिवशी भारताचे मा.उपराष्ट्रपती श्री.एम.वेंकय्या नायडू यांनी संस्थेच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. दिनांक दोन दिवसानंतरचा म्हणजे ८ फेब्रुवारी २०२२. मग काय तयारीची लगीनघाईच उडाली. असा कार्यक्रम होणार हे गृहित धरून तयारी होतीच. पण प्रत्यक्ष तो क्षण जवळ येत असताना सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे होतायत ना याकडे सर्वांचे सर्व पातळ्यांवर आणि सर्व बाजूंनी लक्ष आणि योजनेप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत सहभाग. ठरल्या योजनेनुसार दिल्लीत जाणाऱ्यांच्या सूचीत माझे नाव निश्चित झाले. आणि आज सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ ला अस्मादिक उडाले विमानातून थेट दिल्लीला...
आज अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली.
सुधीर गाडे, पुणे
Abhinandan Sir
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAwesome experience 👍
ReplyDeleteहो.,🙏🙏
DeleteGreat congratulations 🎉🎉🎉
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअभिनंदन सर,
ReplyDeleteमाझे शिक्षण आणि जडणघडण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आणि महाविद्यालयात झाल्याचा आयुष्य सुखकर होण्यात फार मोठा फायदा झाला.
समारंभासाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद
Delete🙂👌👏👍आणिक कार्यप्रसारासाठी भरपूर अशा संधी मिळोत आपल्याला 🙏🏻😊
ReplyDeleteधन्यवाद, 🙏
Deleteमनःपूर्वक अभिनंदन सर, शुभेच्छा🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमनातून एखादी गोष्ट ठरवली किंवा इच्छा असली कीं ते साध्य होतच प्रयन्त करत राहिलो तर ठरवलेल्या गोष्टी आपल्या आयुष्य घडत जातात
ReplyDeleteधन्यवाद
Delete