पुणेकरहो चालण्याची सवय करूया!

 

काल (६/०३/२०२२) मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले. त्यानंतर नव्याची नवलाई म्हणून कालपासून पुणेकर नागरिकांनी मेट्रोतून प्रवासाची उत्सुकता दाखवत गर्दी केली आहे.

कालच्या (६/०३/२०२२) भाषणात मा.मोदीजींनी विकासाचा आराखडा, उद्दिष्ट सांगितले. पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्या पुणेकरांसाठी बोलून दाखवला की मेट्रोतून प्रवासाची सवय सर्वांनी लावून घ्यावी. सरकारी योजना एका टप्प्यावर पोचली आहे. पण ती यशस्वी होण्यासाठी आता पुणेकर म्हणून आपली जबाबदारी आहे की आता आपण ही सवय करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपले, घर, कामाचे ठिकाण ते मेट्रो स्थानकापर्यंत चालत जाणे आवश्यक ठरणार आहे. पण सर्वसाधारणपणे बोलायचे ठरले तर पुण्यातील बऱ्याच जणांना अगदी घराच्या, कार्यालयाच्या पहिल्या पायरीपर्यंत गाडी नेण्याची सवय असते. ही सवय बदलून चालण्याची सवय करायली हवी. याबाबत मुंबईकरांचे अनुकरण करण्यासारखे आहे असे मला वाटते. चला पुणेकरहो चालण्याची सवय करूया.


आज  (७/०३/२०२२) मएसो शिक्षण प्रबोधिनी बैठकीसाठी मएसोचे आजीव सभासद श्री.गोविंद कुलकर्णी यांच्यासोबत आज मेट्रोतून प्रवास केला. 🙂



सुधीर गाडे,  पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख