एक प्रसंग समाधानाचा
सोमवार ७ मार्च २०२२ रोजी मएसो शिक्षण प्रबोधिनीच्या बैठकीत जाण्यासाठी निघालो असताना मुख्य दरवाजाजवळ आपल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची २०१७-१८ ची इ.१२ वी इलेक्ट्रॉनिक्सची माजी विद्यार्थ्यानी विस्मया मुळे भेटली. ती सध्या पुण्यामध्ये कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे. मेट्रोतून जाण्यासाठी म्हणून ती आली होती. वाटेत आमची भेट झाली. ती अगदी मनापासून म्हणाली की सर तुमच्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक्स चांगले जमते आहे. छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. आता पुन्हा जेव्हा प्रत्यक्ष रुपात महाविद्यालय सुरू झाले त्यावेळी तिच्याशिवाय तिच्या बरोबरच्या फक्त १-२ मुलींनाच प्रात्यक्षिक व्यवस्थित करायला जमले. हे अगदी उत्साहाने ती सांगत होती.
मी बऱ्याच वेळा आमच्या विद्यार्थ्यांना गंमतीने म्हणतो की सुधीर भोसलेसर आणि आमच्या जाचातून पुढे जाऊन तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकलातच तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. विस्मयाला मी त्या वाक्याची आठवण करून दिली. यानिमित्ताने मोकळेपणाने एक गोष्ट मी सांगतो की सुधीर भोसलेसरांकडून मलादेखील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, मिळत आहेत. आमच्या प्रयत्नांतून विद्यार्थी शिकत असतात याचा आनंद आहे.
विस्मयासारखे विद्यार्थी भेटून सांगतात तो प्रसंग निश्चितच समाधानाचा असतो. 🙂
( नंतर विस्मया भोसलेसरांनाही भेटली. 🙂)
सुधीर गाडे, पुणे
आपले करिअर घडविण्यात आई-वडिलां बरोबरच सिंहाचा वाटा गुरुजनांचा सुद्धा असतो हे विस्मयाच्या बोलण्यावरून सिद्ध होते. सर्व गुरुजनांना माझा सादर प्रणाम.
ReplyDeleteहोय.
Deleteनमस्कार.