मनातलं जनासाठी भाग १ ओळख
" अरे, काय यार? काय बोअर होतंय ना?" मनोज म्हणाला. " हो ना नुसता पकलोय, दोन दिवस!" विजयंत उद्गारला. शहरातील अतिशय सुखवस्तू भागातील भजनलाल रस्त्यावरच्या " बोस्टन काऊंटी"मधील हा गृप. कोणाचे आईवडील डॉक्टर, तर कोणी बिल्डर, तर कोणाचे वकील तर कोणाचा घरचा उद्योग. त्यांच्यासारख्या पॉश लोकांची ही त्यांच्याच स्टेट्सला शोभणारी ही बोस्टन काऊंटी. त्यामुळे नवनवीन गाडया, या ना त्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्या, शहरातल्या प्रत्येक मॉलमध्ये ट्रेंडिंग काय आहे याचे अपडेट्स ठेवून त्याप्रमाणे शॉपिंग प्लॅन करणारा हा गृप.थिएटरला तर बऱ्याचवेळा फर्स्ट डे चा शो बघायचा ही तर जणू नेहमीची गोष्ट. पण मधूनमधून सिटीत होणारे लाइव्ह परफॉर्मन्सला जाणं तर मस्टच. असा सगळा माहौल असलेल्या या ग्रुपचं नावही Enjo गृप. कशाला उगीच ते लांबलचक enjoyment असं म्हणायचं म्हणून हा Enjo गृप किंवा नुसताच E गृप. आणि त देखील वेगळ्या अर्थानं खरं होतंच. कारण सर्वच जण 24×7 ऑनलाइन असणारेच. त्यामुळे सतत E communication चालूच.त्यामुळंही हा e गृप. आता सदैव आनंदात असणाऱ्या या गृपमध्ये मनोज, विजयंत हे जणू ल...