मनातलं जनासाठी भाग १ ओळख

  " अरे, काय यार? काय बोअर होतंय ना?" मनोज म्हणाला.

" हो ना नुसता पकलोय, दोन दिवस!" विजयंत उद्गारला.


शहरातील अतिशय सुखवस्तू भागातील भजनलाल रस्त्यावरच्या " बोस्टन काऊंटी"मधील हा गृप. कोणाचे आईवडील डॉक्टर, तर कोणी बिल्डर, तर कोणाचे वकील तर कोणाचा घरचा उद्योग. त्यांच्यासारख्या पॉश लोकांची ही त्यांच्याच स्टेट्सला शोभणारी ही बोस्टन काऊंटी. त्यामुळे नवनवीन गाडया, या ना त्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्या, शहरातल्या प्रत्येक मॉलमध्ये ट्रेंडिंग काय आहे याचे अपडेट्स ठेवून त्याप्रमाणे शॉपिंग प्लॅन करणारा हा गृप.थिएटरला तर बऱ्याचवेळा फर्स्ट डे चा शो बघायचा ही तर जणू नेहमीची गोष्ट. पण मधूनमधून सिटीत होणारे लाइव्ह परफॉर्मन्सला जाणं तर मस्टच. असा सगळा माहौल असलेल्या या ग्रुपचं नावही Enjo गृप. कशाला उगीच ते लांबलचक enjoyment असं म्हणायचं म्हणून हा Enjo गृप किंवा नुसताच E गृप. आणि त देखील वेगळ्या अर्थानं खरं होतंच. कारण सर्वच जण 24×7 ऑनलाइन असणारेच. त्यामुळे सतत E communication चालूच.त्यामुळंही हा e गृप. आता सदैव आनंदात असणाऱ्या या गृपमध्ये मनोज, विजयंत हे जणू लीडरच. मग बाकीचे सुकेत, निधी, सानिया,रमोला,प्रत्युष हे त्यांचे एकदम क्लोज फ्रेंड्स तर होतेच.गेले जवळजवळ दोन दिवस ते काउंटी मध्येच अडकून पडलेलं.तिकडं कुठं वारेगावला काहीतरी न्यूइसन्स झाला होता त्यामुळे सिटीत बाहेर पडणं अवघड झालं होतं.त्यामुळं e ग्रुपच्या लाईफमध्ये काहीच हॅपनिंग घडत नव्हतं.आणि त्यामुळेच मनोज म्हणाला की काय बोअर होतंय. सगळेजण त्यांच्या नेहमीच्या फेवरीट स्पॉटवर म्हणजेच काउंटीच्या क्लब हाऊससमोर बसलेले होते.
एवढ्यात त्यांचं लक्ष सोसायटीच्या गेटकडं गेलं. कारण तिथं सिक्युरिटी गार्डसमोर कोणीतरी एकजण उभे होते.तसे दिसायला मिडफिफ्टीजमधले वाटत होते.ब्लॅककलरची जीन्स आणि डार्क मरून कलरचा कुडता घातलेला हा माणूस आत येऊ पहात होता आणि सिक्युरिटी गार्ड जोरजोरात हात हलवून त्याला नाही म्हणत होता.थोडा वेळ e गृपने दुर्लक्ष केलं पण त्यांचा आवाज वाढतच चालला. मग न राहवून मनोजने सुकेतला तिकडं पाठवलं.
सुकेत गेटवर पोचला आणि त्यानं गार्डला विचारलं, " सिक्युरिटी क्या प्रॉब्लेम है? क्यूँ शोर मचा रहे हो?"
" देखो ना साब इनको अंदर आना है लेकिन किस के पास जाना है पूछा तो बोल रहे है की नाम अभी याद नहीं आ रहा। अभी आप ही बोलो इनको अंदर कैसे आने दे?"
आता सुकेत त्या गेस्टकडे वळला आणि विचारलं," अंकल अहो नाव सांगून टाका मग सोडतील."
यावर ते अंकल म्हणाले," अरे, ते नाही का इंडस्ट्री चालवतात आणि इंडोलॉजीमध्ये आवड म्हणून काम करतात.त्यांच्याकडे जायचंय मला."
" हा म्हणजे , बीडकरअंकल का ?"
" हां, आत्ता आठवलं विजय बीडकर."
" ते बी ५०२ मध्ये राहतात.सिक्युरिटी नाम लिखो इन का और जाने दो. पण अंकल तुमचं नाव काय?"
" मी प्रफुल्ल मुर्डी. अरे आता असं मध्येच विसरायला होतं. बर झालं तू भेटलास आणि विजयचं नाव आठवलं.thank you young friend."
सुकेत एकदम दचकलाच " अहो फ्रेंड काय काका?आपण तर आत्ताच भेटलो ना."
" अरे म्हणतात ना, friend in need is friend indeed. म्हणून तू माझा आता फ्रेंडच झालास."
"अरे, हा काय गळेपडूपणा आहे.मान ना मान मैं तेरा मेहमान असली गत झाली ही तर." सुकेत मनातल्या मनात बडबडला. "बरं, बाबा राहिलं .ओळख तर झाली आपली." जणू सुकेतच्या मनातलं वाचल्यासारखं मुर्डी म्हणाले.
सुकेत जरा सुटल्यासारखा झाला आणि म्हणाला" अंकल डाव्या हाताची दुसरी बिल्डिंग."
मुर्डी बी बिल्डिंगकडे गेले आणि सुकेत क्लब हाऊसकडे.
" कोण होते रे?आणि काय झालं होतं?" मनोजनं लगेच विचारलं.
मग सुकेतनं सगळं सांगितलं." सुटलो यार! म्हणे फ्रेंड झालो आपण.नुसते पकवतात असले लोक्स."
" जाऊदे केत.अरे होत असतं असं कधी कधी." निधीनं त्याला दिलासा दिला.
Enjo गृपनं असं म्हणण्याचं कारणही होतं. बोस्टन काऊंटीमधलं वातावरण कितीही मॉडर्न असलं तरी सिनियर लोकांच्या चौकशांमधून ही तरूण मंडळी काही सुटली नव्हती.कुठे चाललाय, काय प्रोग्राम आहे, कोण बरोबर आहे, एवढे लोक कशाला आशा एक ना अनेक शंका.त्यामुळं e गृपला प्रोग्राम नको पण चौकशा पुरे अशी म्हणायची वेळ यायची. त्यामुळे असे लोक्स दिसले की कल्टी मारून पसार होणं हा एक e गृपचा कार्यक्रमच होऊन बसला होता.त्यामुळे कोण कुठला नवीन सिनियर सिटीझन म्हणजे गृपच्या भाषेत "सिनसि" फ्रेंड झाला म्हणजे मेलोच असं गृपला वाटणं साहजिकच होतं.त्यामुळे सुटल्यासारखं वाटून सर्वांनीच एकमेकांना टाळी दिली.आणि गप्पात गुंग झाले.पण लवकरच प्रफुल्ल मुर्डी त्यांच्यातलेच होणार होते याची त्यांना कल्पनाच नव्हती.

सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख