मनातलं जनासाठी भाग १० : खाद्य उद्योग - उद्भवणारे प्रशन
नेहमीप्रमाणे ई गृप आज कट्ट्यावर जमला होता. गप्पा टप्पा सुरू होत्या. पण प्रत्युष आज शांत शांतच होता. कुणी त्याला थेट प्रश्न विचारला तरच तो बोलत होता आणि तेही मोजकंच. शेवटी निधीने त्याला विचारले, " अरे, प्रत्युष काय झालं आज? एकदम गप्प गप्प आहेस अगदी ." " अगं आमच्याकडे त्या कमलामावशी येतात त्या माहिती आहेत ना तुला?" प्रत्युषने विचारले. " प्रत्युषने विचारले. " हो तर. त्या किती व्यवस्थित आणि चांगलं काम करतात. अचानक काय झालं त्यांना?" निधी म्हणाली.
एवढ्यात तिकडून प्रफुल्ल मुर्डी येताना दिसले. मग विजयंतने त्यांना हात केला आणि तो म्हणाला " हाय अंकल! कुठून येताय?" मुर्डी सांगू लागले, " अरे माझ्या ओळखीचे एकजण आहेत. त्यांच्याकडे गेलो होतो. त्या घरातील सर्वांना एकाचवेळी उलट्या आणि जुलाब सुरू झालेत कालपासून. " त्यांच्या मदतीसाठी गेलो होतो. " अरेच्चा अंकल, आमच्याकडे कामाला येणाऱ्या कमलामावशींच्या मदर इन लॉला पण असलाच त्रास सुरू झालाय. त्यांना हॉस्पिटलाइज केलंय म्हणून कमलाबाई कामावर आल्या नाहीत. त्यांच्या मदर इन लॉची तब्येत खूपच बिघडली आहे. " प्रत्युषने सांगितले.
" काय सिच्युएशन आहे ही!" रमोला उद्गारली. " कशामुळे झाले असेल असे?" मनोजने विचारले. " अरे ऑब्हियस आहे. फूड ॲडल्ट्रेशनमुळे! काहीतरी मिसळले असेल." विजयंत लगेच म्हणाला. " पण अंकल, माझे ग्रॅंडपा म्हणायचे की 'अन्न हे पूर्ण ब्रह्म ' असते. मग असं कसं काय करतात लोक?" प्रत्युष म्हणाला. मुर्डी आता अजून गंभीर झाले आणि सांगू लागले " अगदी बरोबर आहे तुझं. आपल्याकडे 'अन्न हे पूर्ण ब्रह्म ' ही संकल्पना खूप प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे अन्नदानाला पुण्याचे काम मानतात. पण एकदा का माणसाला पैशाची हाव सुटली की योग्य अयोग्य याचं भान राहत नाही. मग अशी हाव सुटलेले लोक ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळ करतात, वजन, माप यात फसवणूक करतात. योग्य दर्जाचे घटक पदार्थ वापरण्याऐवजी दिखाऊपणा आणणारे रासायनिक, कृत्रिम घटक यांचा वापर केला जातो. " " ही घातक रसायने पोटात गेल्यावर माणसांना त्रास होतो. होय ना?" सुकेत म्हणाला. " " सारखे सारखे असले फूड आयटम्स खाल्ले माणसांच्या इन्टर्नल सिस्टीम्स डॅमेज होतात. ऑर्गन्समध्ये इश्यूज डेव्हलप होतात. मग ते क्युअर करणं अवघड होऊन बसतं." विजयंत म्हणाला. " मग अशा अप्रामाणिक मार्गांची सवय झाली की ही माणसं आणखीनच सीझन्ड होत असतील." सानिया म्हणाली.
" पण मग गव्हर्नमेंट हे कंट्रोल का करत नाही?" प्रत्युषने रागाने विचारले. " अरे, गव्हर्नमेंटने यासाठी वेगळं डिपार्टमेंट सुरू केले आहे. रुल्स , रेग्युलेशन्स बनवले आहेत. यासंबंधी काही स्टोरी असलेला 'अरुवम ' नावाचा एक तेलुगू मूव्हीदेखील येऊन गेला. पण काही लाचखोर लोक ॲडल्ट्रेशनकडे दुर्लक्ष होतात आणि पब्लिकला त्याचा त्रास होतो. " विजयंतने सांगितले. " आपल्या विशाल देशात हे सर्व प्रकार नियंत्रित करायचे तर केवढी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल?" मुर्डींनी विचारले. सगळेजण थोडे विचारात पडले. " अहो अंकल, आपली पॉप्युलेशन जवळपास दीड बिलियन होत आली. केवढ्या ह्यूज सिस्टीम्स उभ्या कराव्या लागतील. किती हर्क्युलियन टास्क आहे हा! कसा बरं प्रॅक्टिकल होईल?" सानिया म्हणाली. " मग गव्हर्नमेंटने काय फक्त बघत बसायचे?" सुकेत उद्गारला. " अरे ड्यूड , यासाठी टू फोल्ड स्ट्रॅटेजी हवी." विजयंत समजावू लागला. " पहिलं म्हणजे गव्हर्नमेंटला सिस्टीम्स अजून स्ट्रॉंग कराव्या लागतील आणि पब्लिकमधली ऑनेस्टी वाढायला हवी. " " पण हे प्रामाणिकपणा वाढवायचे काम कोण करणार? कसं करणार? " मुर्डींनी विचारले. " ते काम स्कूल्स, कॉलेजेस् यांचं आहे. ऑब्हियस आहे." रमोला म्हणाली. " पण सध्या तिथे हे काम पूर्ण व्यवस्थितपणे होते का?" परत मुर्डींचा प्रश्न. ई गृप आता जरा विचारात पढला. तेवढ्यात मुर्डींनी अजून एक प्रश्न विचारला. " हे काम फक्त शाळा महाविद्यालये यांचंच आहे का? " आता ई गृप अजून विचार करु लागला. अचानक मनोजला गृपचा बाहेर जायचा प्लॅन आठवला आणि तो म्हणाला " अंकल, आता ना आम्हाला बाहेर जायचं आहे. आपण याबाबत नक्की डिस्कशन करु." " हो , हो बोलू ना!" मुर्डी म्हणाले. ई गृप बाहेर पडू लागला पण जाताना प्रत्येकाच्या डोक्यात झालेल्या चर्चेचाच विचार येत होता.
सुधीर गाडे, पुणे
खरंय
ReplyDeleteदुर्दैवाने हो
Delete