दुचाकी लावताना
" बरं, झालं तुम्ही गाडी मेन स्टॅंडवर लावली." मध्यंतरी मी एके ठिकाणी गाडी लावताना शेजारी लावलेली स्वतःची गाडी काढण्याची वाट बघत असलेले एकजण मला म्हणाले. " मी नेहमी मेन स्टॅंडवर गाडी लावतो." मी उत्तर दिले. याबद्दल मनात नेहमीच विचार येत असतो. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) पुणे शहरात दुचाकींची संख्या खूप मोठी आहे. बहुतेक वेळा बऱ्याच गाड्या साईड स्टॅंडवर लावलेल्या दिसतात. साईड स्टॅंडवर गाडी लावणे जास्त सोपे आणि चटकन होणारे असते. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही सहजपणे गाडी साईड स्टॅंडवर लावतात. अनेक वेळा असे होते की मेन स्टॅंड वापरले जातच नाही. त्यामुळे चुकून कधी ते वापरायचे म्हटले तर सहजासहजी शक्य होत नाही. त्यासाठी खूप ताकद लावावी लागते. दोन वाहनांच्या मध्ये असलेल्या थोड्याशा जागेत गाडी लावता येत नाही. तेव्हा आजूबाजूची वाहने मेन स्टॅंडवर लावण्यासाठी खूप खटपट करावी लागते. साईड स्टॅंडवर गाडी लावली की त्यासाठी जास्त जागा लागते. साधारण १५% जास्त जागा लागते असे मला वाटते. म्हणजे ...