एक क्षण आनंदाचा
तसे तर प्रत्येक अंक महत्त्वाचा असतो. परंतु काही अंकांचे महत्त्व थोडे अधिक असते. आजचा माझ्या दृष्टीने असाच एक महत्त्वाचा अंक म्हणजे ५०००१ आज माझ्या ब्लॉगचे लेख कितीवेळा वाचले गेले याची संख्या ५०००१ अंक ओलांडून पुढे गेली.
( आज सायंकाळी ७ च्या सुमाराची आकडेवारी)
दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांसंबंधी लेख लिहून मी ब्लॉग लिहिण्याला सुरुवात केली. विविध विषयांवर, विविध निमित्ताने लेखन झाले. आप्तेष्ट, मित्र , स्नेही, सहकारी, परिचित या सगळ्यांकडून या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनाला सुखावणारी ही गोष्ट आहे.
ब्लॉग सुरू करताना मित्रवर्य निखिल वाळिंबे याच्याशी चर्चा केली होती. खूप महत्वाच्या सूचना त्याने मला केला. त्याचा निश्चितच उपयोग झाला.
( ब्लॉग वाचकांच्या स्थानांच्या संख्येचे विश्लेषण)
आज २४ नोव्हेंबर २०२३ रोजी वाचक संख्या ५०००१ च्या पुढे गेली. योगायोगाची गोष्ट अशी भगवान गौतम बुद्ध यांच्या करूणेचा प्रभाव ज्यांच्या मनावर होता आणि बुद्धांच्या विषयी अतिशय श्रद्धा भाव ज्यांच्या मनात होता त्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर लिहिलेल्या १६० व्या लेखानंतर ही संख्या वाचक संख्या ५०००१ झाली. निश्चितच हा एक क्षण आनंदाचा आहे.
सर्व वाचकांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
सुधीर गाडे, पुणे
गाडे सरांची विषयांची निवड आणि लेखन शैली याला तोड नाही त्यामुळे लवकरच सरांच्या ब्लॉगची वाचक संख्या १००००१ इतकी नक्की होणार यात तिळमात्र शंका नसावी. खूप खूप अभिनंदन सर.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद डॉक्टर!
Deleteतुमच्या शुभेच्छा मोलाच्या आहेत.