सवयीबद्दल काही....
सवय म्हणजे काय तर वयासोबत येते ती सवय असे म्हटले जाते. याबाबत अनेक प्रकार पहायला मिळतात. काहीवेळा गरजेतून सवय लागत असते. याबाबत प्रसिद्ध मराठी साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी पुण्यातील एका जुन्या पिढीतील वक्त्यांच्या सवयीबद्दल सांगितले होते. बऱ्याच जणांना भाषणासाठी उभे राहिले की हातांचे काय करायचे हे समजत नाही. त्यावर या वक्त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला होता. ते भाषणाला येताना खूप बटन असलेला लांब कोट घालून येत असत. भाषणाला उभे राहिले की वरून एक एक बटन काढायला सुरुवात करत. शेवटचे बटन काढले की परत खालून एक एक बटन लावत ते वरच्या बटनापर्यंत येत. पुन्हा वरून एक एक बटन काढायला सुरुवात करत. हा क्रम भाषण संपेपर्यंत चालत असे. गरजेतून लावून घेतलेल्या सवयीचे आणखी एक उदाहरण. प्रख्यात निवेदक , मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना सतत केसातून हात फिरवायची सवय होती. त्याबद्दल बोलताना त्यांनी खुलासा केला होता की एकदा त्यांना एका तरूणीने तुमचे केस खरे आहेत की तो विग आहे असे विचारले होते. तेव्हा त्यांनी केस खरे आहेत असे सांगितले. त्यानं...