शब्दांचे उच्चार
" ते काम्पुटर म्हणताएत!" एका बैठकीनंतर त्या बैठकीतील सहभागी असणारे एक जण दुसऱ्याबद्दल म्हणत होते. " असा माणूस कसा काय योग्य निर्णय घेऊ शकतो?" असा त्यांचा प्रश्न होता. बऱ्याच वेळा व्यक्तींच्या उच्चाराबाबत अशी प्रतिक्रिया येते विशेषतः इंग्रजी शब्दांचे उच्चार न जमल्यास मराठी माणसाबाबत अशी प्रतिक्रिया तर हमखास येते याची अजून काही उदाहरणे म्हणजे काही जण विशेषतः कमी शिकलेले अथवा न शिकलेले लोक accident ला ऑक्सिजन, late ला लॅट, overhaul व्हराइलिंग( किंवा तत्सम) असे उच्चार करतात. काही मेकॅनिक " गाडीचा मोसम तुटतो." असे म्हणतात यात ' मोसम' हा उच्चार ' motion' चा आहे की 'momentum' चा हे सांगणे कठीण आहे.त्यावेळी बऱ्याच शिकलेल्या लोकांची प्रतिक्रिया ही गंमत वाटण्याची, कमी लेखण्याची अथवा काही वेळा टर उडवण्याची असते. असे करणे बरोबरच आहे असे त्यातील बऱ्याच जणांना वाटते. ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र) परंतु याबाबत विचार करण्यासारखे काही मुद्दे आहेत. एक तर इंग्रजी भाषा ...