इंग्रजांच्या राज्ययंत्रेणेतील भारतीय आध्यात्मिक सत्पुरूष

       भारताला अध्यात्माची दीर्घ परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक साधना करणारे स्त्री पुरुष सर्व काळात होऊन गेले. आध्यात्मिक साधना करणारे हे स्त्री पुरुष व्यावहारिक गोष्टींपासून दूर राहिलेले आढळतात. प्रामुख्याने अशा व्यक्ती या संन्यास घेऊन स्वतःच्या उपासनेत मग्न राहिलेल्या दिसतात. परंतु याला काही अपवाद आहेत. इंग्रजांनी १८ व्या शतकात क्रमाक्रमाने आपली सत्ता वाढवत नेली आणि १९ व्या शतकात ही सत्ता स्थिरावली. याच काळात काही अध्यात्मिक पुरुष इंग्रजांच्या राज्य यंत्रणेत कार्यरत होते. त्याची ही काही उदाहरणे.

          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

       मूळ पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे निवासी असणाऱ्या देशपांडे कुटुंबात १८१५ मध्ये यशवंत महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांमुळे यशवंत महाराजांना वयाच्या चौदाव्या वर्षी कारकुनाची तात्पुरती नोकरी लागली. त्यांच्या अंगभूत हुशारीमुळे वयाच्या १६ व्या वर्षी ते नोकरीत कायम झाले. १८२९ ते १८७२ असा दीर्घकाळ त्यांनी इंग्रजांच्या महसूल खात्यात नोकरी केली. त्यांना वरचेवर बढतीदेखील मिळत गेली. त्यांना‌ सद्गुरू निर्मालाचार्य यांच्याकडून गुरुपदेश मिळाला होता. दीक्षेनंतर सिद्धपादाचार्य हे नाव घेतले. १८७०-७१ या वर्षी महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्नदशा होऊ लागली. यशवंत महाराज त्यावेळी बागलाण तालुक्यात तहसीलदार होते. त्यांना लोकांचे होणारे हाल बघवेनात. त्यांनी स्वत:ची सर्व संपत्ती विकून लोकांना मदत केली. पण अजूनही अधिक मदतीची आवश्यकता होती. तेव्हा त्यांनी सरकारी खजिन्यातून लोकांना जवळपास १,२७,०००/- रूपयांची मदत केली. आजच्या हिशोबाने ही रक्कम कोट्यवधी रुपयांची होईल. या मदतीमुळे शेकडो लोकांचे जीव वाचवले. याविरुद्ध तक्रार झाली. वरिष्ठ अधिकारी पाहणीसाठी आले असता त्यांना कोणतीही तूट आढळली नाही. हा चमत्कार वाचला की संत दामाजी यांच्या जीवनातील अशाच प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या यशवंत महाराजांनी अनेकांना दीक्षा दिली. लोकांनी प्रेमाने त्यांचे नाव 'देव मामलेदार' असे ठेवले होते. १८८७ मध्ये यशवंत महाराजांचे देहावसान झाले.

  

       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

    या मालिकेतील दुसरे सत्पुरुष म्हणजे लाहिरी महाशय. श्यामाचरण लाहिरी उर्फ लाहिरी महाशय यांचा जन्म १८२८ चा. बंगालमधील. तत्कालीन पद्धतीनुसार यथावकाश शिक्षण नोकरी विवाह या गोष्टी घडत गेल्या. इंग्रजांच्या लष्करी खात्यात ते नोकरी करत होते. अचानकपणे १८६१ मध्ये त्यांची बदली राणीखेत येथे झाली. तेथे एके दिवशी जंगलात फिरायला गेले असताना ते वाट चुकले. तेव्हा त्यांची भेट महावतार बाबाजी यांच्याशी झाली. बाबाजींनी सांगितले की "तुला दीक्षा देण्याची वेळ झाली असल्याने मीच या गोष्टी घडवून आणल्या." बाबाजींनी त्यांना अनुग्रहित करून 'क्रिया योगाची'  दीक्षा दिली. नंतर उर्वरित आयुष्य बनारसमध्ये राहून पात्र व्यक्तिंना देण्याची आज्ञा केली. ही घटना घडल्यानंतर लवकरच लाहिरी महाशय यांची बनारसला बदली झाली. तिथेच त्यांनी शांतपणे पुढील कार्य केले. अर्थातच ते कार्य गृहस्थाश्रमात राहूनच केले. इंग्रजांच्या यंत्रणेत त्यांनी जवळपास तीन दशके नोकरी केली. त्यांचे शिष्य युक्तेश्वर गिरी तर परात्पर शिष्य परमहंस योगानंद. योगानंदजींनी 'योगदा सत्संग सोसायटी' च्या माध्यमातून अमेरिका आणि जगभर क्रिया योगाचा प्रसार करण्याचे काम केले. लाहिरी महाशय यांचे निधन १८९५ मध्ये झाले.

( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      या मालिकेतील तिसरे सत्पुरूष आहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांचा जन्म १८४५ मध्ये झाला. त्यांच्या आईची इच्छा होती कुलकर्णी या पदावर काम करावे त्या काळात गाव पातळीवर महसुलाचे काम करणारे व्यक्तीला करणे असे म्हणत असत आईच्या ला मान देऊन गोंदवलेकर महाराजांनी सुमारे चार महिने कुलकर्णीपणाचे काम केले परंतु नंतर च्या नेहमी ते काम सोडून दिले आणि रामनामाचा प्रसार करण्याचे आध्यात्मिक कार्य हातामध्ये घेतले त्यांची यात माती कीर्ती सर्वत्र पसरली पुढे एकदा पंढरपुरी येथे श्री विठ्ठल मंदिरातील बडव्यांच्या मध्ये वाद झाला आणि येथील महापूजा बंद पडली यामुळे वारकरी भावीकांची गैरसोय होऊ लागले त्याची तक्रार इंग्रज अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोचली बंदी अधिकाऱ्यांनी गोंदवलेकर महाराजांची संपर्क केला आणि त्यांना मध्ये करण्याची विनंती केली त्याप्रमाणे गोंदवलेकर महाराज यांनी पंढरपूरला जाऊन या विषयावर लक्ष घातले आणि उभयपक्षी माननीय असा तोडगा काढला महापूजा विवरण पूर्ववत सुरू झाली गोंदवलेकर महाराज यांचे देहावसान हे १९१३ मध्ये झाले. 

        इंग्रजांचा अन्याय अत्याचार यांना कंटाळून वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र उठाव करण्याचे ठरवले. त्यांचा गोंदवलेकर महाराज यांच्याशी परिचय होता. उठाव करण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत यासाठी फडके गोंदवलेकर महाराज यांना भेटले. पण महाराजांनी "सांप्रत काळ अनुकूल नाही." असे त्यांना सांगितले. याच प्रकारचा प्रसंग फडके आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या भेटीतही घडला. तरीही फडके यांनी सशस्त्र उठाव केला. परंतु तो अयशस्वी ठरला. या घटना पाहिल्या की इंग्रजांचे राज्य अजून काही काळ राहणार आहे याची जाणीव या सर्व महापुरुषांना होती असे वाटते. त्यामुळे कोणताही प्रतिकार करण्याचे या महापुरुषांनी टाळले असावे असे वाटते. या सर्वांनी आपली सर्व शक्ती अध्यात्म प्रसाराकडे वळवली.

 सुधीर गाडे, पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. यशवंत महाराज, लाहिरी महाशय या सदपुरुषांवर बद्दल प्रथमच ऐकले मी... धन्यवाद सर तुमच्या लेखणीतून माझ्या ज्ञानात भर पडली... सुंदर लेखन केले

    ReplyDelete
  2. खूपच चांगली आणि नाविन्यपूर्ण माहिती. खूप खूप धन्यवाद सर.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉक्टर नमस्कार आणि धन्यवाद!

      Delete
  3. डॉ. नेहा देशपांडे यांनी दिलेली माहिती

    रावसाहेब बाबामहाराज सहस्त्रबुद्धे हे त्या कालचे आर्किटेक्ट होते. इंग्रजांकडे नोकरी केली. बीडकर महाराजांचे शिष्य होते.

    ReplyDelete
  4. छान माहिती, महाराष्ट्र बाहेर पण असे अवलिया असतील त्यांची पण माहिती संग्रहित करावी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची