पुस्तक परिचय :- गोल्डा एक अशांत वादळ
लेखिका वीणा गवाणकर प्रकाशक इंडस सोर्स बुक्स, मुंबई नुकतेच हे पुस्तक वाचून पूर्ण केले. जवळपास दोन हजार वर्षे स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय अढळ ठेवत ज्यू लोकांनी १४ मे १९४८ ला इस्त्राइल राष्ट्र पुन्हा उभे केले. हे उभे करण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती अशांपैकी एक म्हणजे गोल्डा मायर(१८९८-१९७८). त्या इस्राईलच्याच्या १९६९-१९७४ या काळातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रवाही पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकातील भावलेले काही अंश ज्यांचे नाव गोल्डा यांना देण्यात आले त्या त्यांच्या पणजी ज्यूंच्या हालअपेष्टांची जाणीव रहावी म्हणून मीठ घालून चहा पीत असत. लहानपणी अमेरिकेत स्थलांतर झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी शाळेतील गरजू मुलांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून निधी जमा केला. पुढे मोठेपणी इसराइल साठी कोट्यावधी डॉलरचा निधी अमेरिकेतून उभा केला. संघटना, पक्ष यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या गोल्डा अर्धशिशीमुळे दोन दिवस विश्रांतीसाठी घरी राहिल्या तर त्यांच्या लहान असलेल्या मेनाहेम,सारा या मुला-मुलींना अत्यानंद झाला आणि त्यांनी दोन्ही दिवस दंगा-मस्ती...