साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ३)

 स.रा.बोकील सर



बोकील सर आमच्या वर्गाला फक्त एकच वर्ष म्हणजे दहावीला इंग्लिश शिकवायला होते.त्या वर्षी शिकलेल्या कवितेतील "woods are lovely dark and deep but I have miles to go before I sleep" या ओळी अजूनही लक्षात आहेत.
सरांबाबतची एक वेगळी आठवण म्हणजे सरांनी बसवलेली स्नेहसंमेलनातील नाटके.एकूण सरांच्या शिकवण्यात दिसणारा वाचिक अभिनय( आवाजातील चढउतार) आणि मुद्राभिनय ( चेहऱ्यावरील हावभाव) त्यांनी बसवलेल्या नाटकांमध्येदेखील दिसून यायचा. तसेच नाटकाच्या उद्घोषणेच्या वेळी " सदानंद बोकील सादर करीत आहेत" अशी ओळदेखील दरवर्षी ऐकायला मिळायची.
एके वर्षी गणेशोत्सवात व्याख्यानमालेत एक परिसंवाद ठेवला होता.सरांचे वक्तृत्व त्यादिवशी ऐकायला मिळाले आणि त्यादिवशी त्यांनी आपल्या भाषणात वापरलेली " भयचकित नमावे तुज रमणी" ही ओळदेखील चांगलीच लक्षात राहिली.
२७ जुलै २०१९ ला सरांचे निधन झाले. सरांना आदरपूर्वक अभिवादन ..
फोटो सुनील बोकील यांच्या फेसबुक वॉल वरून

48

Comments

  1. खूप छान आठवणींचा संग्रह आणि त्यांना या माध्यमातून उजाळा देण्याचा उपक्रम करत आहात सर... हे वाचून मझ्यादेखील शाळेच्या काही आठवणी नजरेसमोर उभा राहिल्या...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची