साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग ६)
निर्मला वसंत नरगुंदेबाई
माझ्या आठवणीप्रमाणे नरगुंदेबाई काही आमच्या वर्गाला शिकवायला नव्हत्या. पण शाळेत असताना मी राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा दरवर्षी दिल्या. त्यातल्या एका परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी आम्हाला शिकवल्याचं आठवतं. बाई अगदी खळखळून हसून शिकवायच्या. त्या परीक्षेच्यावेळी तोंडी परीक्षा देखील झाली.त्यावेळेला उत्तर देताना बरेच जण स्वतःबद्दल बोलताना "हम" म्हणायचे. मग बाई लगेच म्हणायच्या " आप पागल हो या राजा? ये दो लोगही खुद को हम बोल सकते हैं।"
बऱ्याच वर्षांनी नरगुंदेबाई पुण्यात साखरवाडी मित्रमंडळाच्या एका कार्यक्रमात भेटल्या. त्याच कार्यक्रमात एका साखरवाडीकरांचा महिलांच्या छातीच्या कर्करोगावर औषध शोधून काढलं यासाठी सत्कार झाला. तेव्हा बाईंच्या बोलण्यावरून समजलं की त्यांनादेखील हाच रोग झाला होता आणि शस्त्रक्रियेने छातीचा काही भाग देखील कापून टाकावा लागला होता.
बाईंचं ३ जानेवारी २०११ ला निधन झालं.त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण.!
फोटो तेजस्विनी नरगुंदे कुलकर्णी यांच्याकडून
Comments
Post a Comment