तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनाचा संदेश



 भारतीय समाजजीवनाच्या प्राचीन इतिहासात अनेक महान व्यक्तिंनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या योगदानाने त्यांनी भारत भारताच्या प्राचीन इतिहास परंपरेत अनेक महान व्यक्तिंनी समाजजीवनाला महत्त्वाचे वळण दिले आहे. अशा महान व्यक्तिंपैकी तथागत गौतम बुद्ध हे महत्त्वाचे आहेत. कर्मकांड याचा अतिरेक असलेल्या समाजाला लोक भाषेत समजावून नीतिमूल्यांची चौकट बळकट करण्यात गौतम बुद्धांनी आपले योगदान दिले.

 

हे योगदान देत असताना गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला व्यक्तींना मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे एखादा चांगला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची पात्रता ओळखून त्यानुसार त्याला मार्गदर्शन देतो त्याच प्रमाणे गौतम बुद्धांचे बुद्धांनी देखील समोरील व्यक्तीची पार्श्वभूमी पात्रता पाहून उपदेश केला. उद्धटपणाने त्यांच्याशी बोलणाऱ्या एका शेतकऱ्याला त्यांनी सांगितले, "भ्रांत झालेल्या माणसांची अंत:करणे हे माझे शेत, प्रज्ञा माझा नांगर, वीर्य हा बैल, धर्म हा दंड आणि श्रद्धा हे बीज आहे. चोहीकडे ज्ञानरूपी नांगर फिरवून अज्ञानरूपी कंटक काढून टाकतो व तिथे श्रद्धेचे बी पेरतो. या माझ्या शेतात कामाला जे फळ येते त्याला अमृतफल अथवा निर्वाण म्हणतात."
शेतीशी संबंधित गोष्टींच्या रूपकाने  दिलेला उपदेश त्या शेतकऱ्याला पटला. उपदेश देण्याची ही एक पद्धत तर किसा गौतमी यांच्या प्रसंगात वेगळ्या पद्धतीने उपदेश दिला. किसा गौतमी यांचा  मुलगा मरण पावल्यानंतर त्या सैरभैर झाल्या. ज्यावेळी अशाप्रकारे मृत्यूचे संकट आईवर कोसळते त्यावेळी केवळ शब्दांनी त्या आईची समजूत घालणे अशक्य हे गौतम बुद्धांच्या सहज लक्षात आले. त्यामुळे ज्या घरात मृत्यू झाला नाही अशा घरातून मूठभर मोहरी आणून दिल्यास तुझ्या मुलाला जिवंत करतो असे त्यांनी किसा गौतमीला सांगितले. पुत्रशोकाने वेडी झालेली ती आई घरोघर गेली. अर्थातच मृत्यू न झालेले एकही घर तिला आढळले नाही. त्यामुळे मोहरी ती आणू शकली नाही. परंतु सुरुवातीला आशा पालवून ज्यावेळी ती आई घरोघर जात होती तसा तसा जो वेळ गेला त्याने 'मृत्यू हे अटळ सत्य आहे' हे स्वीकारण्यासाठी तिची मानसिक तयारी झाली. त्यानंतरच गौतम बुद्धांनी तिला उपदेश केला आणि तो तिने ग्रहण केला. अशा विविध प्रकारे उपदेश करणारे गौतम बुद्ध हे चांगले लोक शिक्षक होते.

 

आपल्या्या मार्गावर चालण्यासाठी नीतिमूल्यांची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी नीतिमूल्यांची चौकट आपल्या अनुयायांना आखून दिली. पंचशीलाच्या माध्यमातून आखलेली ही चौकट निश्चितच सदैव मार्गदर्शक आहे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पाडणाऱ्या इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
दुर्दैवाने सध्या समाजात व्यसनांना प्रतिष्ठा लाभली आहे. व्यसनांच्यापाई व्यक्तिगत आयुष्याचे नुकसान तर होतेच परंतु समाजावरदेखील त्याचे विपरीत परिणाम होतात. दुर्दैवाने समाजातील व्यसनांचे प्रमाण वाढले आहे आणि अशा व्यसनांसाठी वाटेल तेवढा खर्च करण्याची तयारी समाजातील काही घटक दाखवतात. त्यामुळे सरकारदेखील सोयीस्करपणे या सगळ्या व्यसनांना चालना मिळेल यासाठी प्रयत्न करत राहते. चित्रपट, नाटक, वेब सिरीज अशा करमणुकीच्या विविध साधनांतून व्यसनांची भलावण केलेली आढळते. हळूहळू समाजमनाला या पद्धतीने वळवण्यात या सगळ्यांचा मोठा वाटा आहे हे आपल्याला सहज समजू शकते. याचप्रमाणे पंचशीलातील अन्य अपेक्षांचा देखील विचार करता येईल.
श्रेष्ठ उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर साधनाची शुद्धता ही फार महत्त्वाची असते. तसेच समाज श्रेष्ठ होण्याचे उद्दिष्ट साध्य व्हायचे असेल तर व्यक्तिंच्या आचरणाची शुद्धता अतिशय आवश्यक आहे. यासंदर्भात तथागत गौतम बुद्ध यांचे विचार सर्वकाळासाठी मार्गदर्शक आहेत. समाजाने त्या पद्धतीने वाटचाल सुरू ठेवणे आवश्यक आहे.

Comments

  1. लेख छान आहे, शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. अनिल फौजदार

    ReplyDelete
  3. अत्यंत मार्मिक👌

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. खूपच माहितीपूर्ण आणि वेगळा लेख आहे सर !!अभिनंदन.
    💐

    ReplyDelete
  6. सुंदर लिखाण केले आहे 🙏

    ReplyDelete
  7. खूप छान लेख 👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय उत्तम आणि सुंदर लेखन 👍👌💐
    मी सुद्धा Santosh Karkhanis यांच्या प्रेरणेतून ब्लॉग लेखन सुरू केले आहे
    माझा आध्यात्म विषयावर ९ पाठ/लेख लिहले आहेत

    ReplyDelete
  9. नमस्कार खूपच छान लेखन

    ReplyDelete
  10. Sir we need to do something for students so that we can inculcate all these good points in coming generations

    ReplyDelete
  11. गौतम बुद्धांवरचा हा लेख अतिशय मार्मिक आणि ज्ञानवर्धक आहे धन्यवाद सर🙏

    ReplyDelete
  12. गौतम बुद्ध यांचे विचार आणि पंचशील मार्गदर्शिका, आज समाजासाठी किती महत्वाचे आहेत...हे सर तुम्ही या लेखात खूपच सुरेख मांडले आहे. सर आपले मनापासून आभार...🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची