साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग १२)
ह्या आठवणी लिहायला सुरुवात केल्यापासून अनेक प्रसंगांची माणसांची मनात पुन्हा एकदा गर्दी झालीय.काय लिहावं आणि काय नाही असं सारखं वाटत राहतं.
शा. शि. चे ( पी.टी. चे नव्हे) वादेसर," टोपल्याला भूक लागली असेल." " दिन में आंखे बंद की तो भी अंधेरा रात में आँखे खोली तो भी अंधेरा" असं म्हणणारे सगरेसर, नववीच्या सुट्टीत दहावीचा अभ्यास करून घेणारे कानडेसर, एन सी सी घेणारे रणवरेसर, आपापल्या शैलीने शिकवणारे सोमणसर,चोपडेसर, चांगणसर, सुरेल गाणाऱ्या आणि स्नेहसंमेलनात चांगले कार्यक्रम बसवणाऱ्या इंगळेबाई, आमच्या बरोबरीच्या मुलांसाठी अगदी जुने असणारे वि.शं. कुलकर्णीसर, शं. बा.कुलकर्णीसर असे कितीतरी शिक्षक, शाळेतील सेवक वर्ग, वयाचा मान राखायला हवा असं शिकवणारे म्हसकरकाका, तांत्रिक वर्गांना शिकवणारे भोसलेसर तशीच शाळेतील चंदर जाडकर अशी सेवकमंडळी, शाळेच्या कार्यालयातील दहिवाळसर,अशी यादी वाढतच जातेय.या आठवणी अगदी " रम्य ते बालपण" ही उक्ती सार्थ करायला लावणाऱ्या. मनामध्ये खोलवर मुरलेल्या. नेहमी आनंद देणाऱ्या.
फोटो अनुपमा देशपांडे यांच्याकडील जुन्या "प्रकाश" वार्षिक अंकातून
Comments
Post a Comment