वजन आपुले....
काही दिवसांपूर्वी एका प्रशिक्षण वर्गात दुपारी जेवणाच्यावेळेस एका बाल ( विद्यार्थी) स्वयंसेवकाला विचारले की भात का घेतला नाहीस. तो म्हणाला वजन जास्त वाढतंय म्हणून डॉक्टरांनी भात खाऊ नकोस म्हणून सांगितलं आहे. मी विचारात पडलो की एवढ्या लहान वयात याला डॉक्टरी सल्ला घ्यायची वेळ आली.
सध्या वाढणारं वजन ही एक मोठी समस्या समाजाच्या काही वर्गात दिसते.
वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळे उपाय करतात.
कोणी ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे दर दोन तासांनी थोडेथोडे खातात कोणी डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या सूचनेप्रमाणे दोन वेळाच जेवतात. काहीजण प्रोटीन शेक, फूड सप्लीमेंट याचादेखील आधार घेतात. काहीजण शस्त्रक्रिया करून घेतात. काहीजण भरपूर व्यायाम आहार नियंत्रण याची मदत घेतात.
मध्यम वयात ही समस्या तर सहजपणे असते. कारण हालचाल कमी आणि आहार तसाच राहतो. पण ज्या वयात मुलं उत्साहाने हालचाली, पळापळी करत असतात त्या वयात वजन वाढणे हे नक्कीच चिंताजनक आहे. गेल्या वर्षीपासून असलेल्या टाळेबंदी मुळे अनेक जणांचं वजन वाढलं असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे जाण्याचा योग आला. ते बऱ्यापैकी स्थूल होते. पण ते आपल्या कामात गढलेले आहेत. चित्रपट सृष्टीतील निर्मिती सावंत, गणेश आचार्य यासारखी मंडळीदेखील बऱ्यापैकी वजनदार असूनदेखील अनेक वर्ष सक्रीय आहे. तर अदनान सामीसारख्या कलाकाराने शस्त्रक्रिया वा अन्य उपचाराने वजन कमी केले आहे. काही राजकीय नेत्यांचे काही वर्षांपूर्वीचे छायाचित्र आणि आताचे छायाचित्र पाहिल आले की त्यांचाही वजनदारपणा जाणवतो. पण तरीही ही मंडळी आताही कृतीशील आहेत.
आपल्या असलेल्या वजनानिशी कसे जगायचे हा प्रश्न आहे अथवा न बदलू शकणारी वस्तुस्थिती हा मुद्दा ज्याचा त्याचा!
सोबतचे छायाचित्र विकिपीडियातील -
डॉक्टरचा सल्ला

Comments
Post a Comment