छ.शिवराय : व्यापाराबाबतची दूरदृष्टी
मध्ययुगीन काळात शेती व व्यापारावरील कर हेच महसुलाचे मुख्य साधन होते. यासाठी व्यापारी , सावकार यांचे राज्यकर्त्यांना महत्त्व वाटत असे. याबाबत शिवाजी महाराजांचे धोरण काय होते हे काही उदाहरणांवरून लक्षात येते. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार) पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या आतताईपणामुळे इंग्रजांचा एकूण दृष्टिकोन, व्यवहार शिवरायांनी चांगलाच ओळखला होता ते ओळखून त्यांच्याशी ते व्यवहार करत होते. याचेच एक विलक्षण उदाहरण आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. आता व्यवहार पूर्ण करायचा तर याचे पैसे द्यायला हवेत. परंतु रायगडावर सद्यस्थितीत रोख रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी देतो. ती तेथे जाऊन वटवा आणि पैसे घ्या असे महाराजांनी सांगितले. हुंडी घेऊन इंग्रजांचा माणूस रायगडावरवरून निघाला आणि मुंबईला पोचला. त्या काळात प्रवासाची साधने म्हणजे घोडा , पालखी इत्यादी असल्यामुळे एकूण प्रवासाला खूप वेळ लागत असे. इंग्रजांच्या त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे सर...