लेकीवरच्या मायेसाठी (भाग १ )

( काल्पनिक कथा ) "काय गं सायली? चेहरा एकदम पडलाय तुझा!" वंदनाकाकींनी विचारलं. सायली म्हणाली, " अहो, काकी काय सांगू? उद्या लेकीला अचानक सुट्टी आहे. आत्ताच समजलं. मला तर कामावर यावेच लागणार आहे . सुशीलला नाही जमणार. तो कंपनीच्या कामासाठी टूरवर निघालाय आणि साक्षीचे आजी आजोबादेखील शेतीच्या कामासाठी कालच गावाकडे गेलेत. आता उद्या तिला घरी एकटीला कसं सोडायचं? कारण आमच्या सोसायटीत बहुतेक सगळेजण नोकरीवर जातात. दिवसभर तसं कोणी नसतं." ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र ) वंदनाकाकी आणि सायलीच्यात नेहमीच बोलणे होत असे. सायलीच्या कंपनीजवळच काकींचं छोटसं दुकान होतं. कामावरून येता जाता सायली छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्याकडून विकत घेऊन जायची. त्यातूनच दोघींची ओळख वाढत गेली. याला तसे फार दिवस झाले नव्हते. जेमतेम एखादं वर्ष झालं असेल नसेल. परंतु सायली वंदनाकाकींशी मोकळेपणाने बोलू शकत असे. कुठलीही अडीअडचण त्यांना सहजपणाने सांगत असे. काकीदेखील आपल्या अनुभवानुसार तिला छोटा मोठा सल्ला देत असत. असा सल्ला ...