प्रतिसाद ( भाग २ )
( काल्पनिक कथा ) पंडित गुणनिधी यांनी शेठजींची नाकारलेली थैली हा शहरात चर्चेचा विषय झाला होता. परंतु जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने पंडितजींची दिनचर्या, कार्यक्रम सुरू होते. त्यांच्या शिष्यांना तर लोक बोलावून घेऊन घडलेल्या गोष्टीबद्दल आपली उलटसुलट मते ऐकवत असत. काही जणांच्या प्रतिक्रिया ऐकून शिष्य अस्वस्थ होत असत. होणारी चर्चा कधीमधी दबक्या आवाजात पंडितजींच्या कानी येत असे. परंतु पंडितजी मात्र या सगळ्यात अतिशय स्थिर बुद्धीने वागत होते. पुढच्या कार्यक्रमांमध्ये काय सादर करायचे, नवीन काय जोडायचे याच्या विचारात गढून जात. तयारी करत होते. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) शेठजींच्या घरी झालेल्या मैफिलीनंतर आठवडाभरातच पंडितजींचा एक कार्यक्रम शहरातच होता. शहरातील ' मुकुंद गायन सभा ' या संस्थेला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने पंडितजींच्या मैफिलीचे आयोजन केले होते. मुकुंद गायन सभा स्थापनेपासूनच नवीन पिढीकडे भारतीय शास्त्रीय संबंधी संगीताचा वारसा सोपवण्याचे काम संगीत शिक्षणाच्या ...