मन झाले मोकळे
( काल्पनिक कथा ) "आता काय करावे ?" राजे विक्रमगुप्त स्वतःशीच उद्गारले? आजूबाजूला कोणीही दासदासी उपस्थित नव्हते. राजांनीच तशी आज्ञा दिली होती एकांत हवा होता म्हणून. राजेसाहेब आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांच्यासमोरची समस्या गंभीर होती. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) अगदी आठ दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. पुन्हा पुन्हा या प्रसंगाचे त्यानना स्मरण होत होते. राजे विक्रमगुप्त आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शिकारीसाठी राजधानी बाहेर पडून जंगलात गेले होते. यावेळी जरा वेगळी वाट त्यांनी निवडली. शिकारीचा आनंद घेताना महाराजांना विलक्षण स्फुरण चढत असे. अशा अनेक शिकारी त्यांनी आजपर्यंत केल्या होत्या. रस्ता नेहमीपेक्षा वेगळा होता. वाटेवरती एका सत्पुरुषांचा आश्रम असल्याची वार्ता महाराजांच्या अग्रदूताने त्यांच्याकडे पोचवली. या सत्पुरुषाच्या दर्शनाला जावे असे राजांच्या मनात आल...