Posts

Showing posts from January, 2026

क्रिकेटच्या आवडीचा एक असाही फायदा

Image
         भारतात साधारणपणे तीन विषयांवर सर्वात जास्त वेळा चर्चा होत असते. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. कोणत्या वेळी कोणत्या विषयावर जास्त चर्चा होईल हे त्या त्या वेळी असणाऱ्या परिस्थितीवर ठरते. एखादा चित्रपट गाजला की चित्रपट सृष्टीबाबतची चर्चा रंगते. निवडणुकांच्या वेळी राजकारणाची चर्चा रंगते आणि क्रिकेट सामन्यांच्या वेळी क्रिकेटची चर्चा रंगते. मग यातील हौशी लोक आपापली मते सांगतात. तसे जाणकार लोक आकडेवारी सांगतात. चर्चा रंगत जाते.             आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला'लगान' सारखा चित्रपट तर काल्पनिक असूनही लोकांच्या मनाची पकड घेतो. भुवन या नायकाच्या बाजूने सर्वचजण उभे राहतात. इंग्रजांच्या खऱ्याखुऱ्या अत्याचारांची वर्णने काल्पनिक कथेतून केली गेली. चित्रपटातील भुवनच्या संघाचा विजय म्हणजे भारताचा विजय असे समाजमन तयार झाले.          एवढे सगळे असले तरी वस्तुस्थिती उरतेच की इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथेच हा खेळ बहरला. सध्यादेखील जगात फुटबॉल खेळणाऱ्या देशाच्या संख्येच्या तुलनेत अगदी कमी संख...