Posts

Showing posts from April, 2026

सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी

Image
          कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की: 'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.' मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात,  कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.                  ( छायाचित्र कृत्रिम बुद्...