Posts

Showing posts with the label हनुमान जन्मोत्सव

उत्सवाची परंपरा पुढच्या पिढीकडे

Image
           आपल्या प्राचीन देशामध्ये सण, उत्सव यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. यात वेगवेगळ्या टप्प्यांवर नवनवीन उत्सवांंची भर पडत गेली आहे. उत्सव सुरू होण्याच्या पाठीमागे धार्मिक , खगोलीय किंवा पर्यावरणीय कारणे आहे हे लक्षात येते. यातील बरेचसे उत्सव हे समाज एकत्र येऊन सुरू होतात. काही उत्सव एखाद्या व्यक्तिच्या पुढाकाराने सुरू होतात. असे सुरू झालेले पुढे कसे चालत राहतात हे समजून घेणे उद्बोधक वाटते.   (भाटे कुटुंबातील उत्सवातील छायाचित्र सौजन्य डॉ. मानसी भाटे)         श्री. नारायण उर्फ उल्हास भिकाजी भाटेकाका पुण्यात पेरुगेटजवळ राहायचे. १९८६ मध्ये ते सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर इथं राहायला गेले. भाटेकाकांनी एसकेएफ या कंपनीत अनेक वर्षे नोकरी केली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त आहेत. त्या भक्तितून घरात दर बुधवारी सत्संग सुरू केला. हळूहळू या सत्संगाला भक्तांची गर्दी वाढत गेली. भाटेकाकांनी याला जोड दिली ती स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या उत्सवाची. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस हा स्वामीं...