Posts

Showing posts from April, 2026

बापाची धडपड

Image
                                  (कथा)          "सॅली, कुठाय डॅड?" स्पृहाचा प्रश्न कानावर आदळला आणि अमोल दचकला. ऑफिसचं प्रेझेंटेशन करण्याच्या अगदी महत्त्वाच्या कामात तो पुरेपूर गुंतला होता. त्यामुळे ह्या प्रश्नाने त्याला ओढून मनानं घरात आणलं. " अग, तुला सांगितलं ना स्पृहा! तो भूर गेलाय." "नाही डॅड! ते काही नाही! तुम्ही भूर जाऊन सॅलीला घेऊनच या. मला काही माहित नाही!" असं म्हणून स्पृहा मोठ्याने भोकाड पसरून रडू लागली. आता काय करावं हेच अमोलला सुचेना. त्यानं पटकन लॅपटॉप बंद केला आणि स्पृहाचा हात हातात घेऊन तिला थोपटत सांगितलं, "अगं, तो भूर गेलाय. कसा आणू त्याला?" "आणा! आणा! आणा!" हातपाय आपटत स्पृहा किंचाळली. आता मात्र अमोल हतबुद्ध झाला. शेवटी कसंबसं तो म्हणाला, " आणतो बरं, बेटा." स्पृहा थोडी शांत झाली आणि तिथून निघून तिच्या खोलीत गेली.                     (चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)         दिग्मूढ ...

महापुरुषांनी केलेली भीतीवर मात

Image
          साधारणपणे माणसाच्या मनात काही भीती पिढ्यानपिढ्या घर करून राहिली आहे असे सांगितले जाते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या भीती समाविष्ट आहेत. त्यामध्ये आपण उंचावरून पडतो आहोत या प्रकारची एक भीती माणसाच्या मनात असते. या भीतीचा माणसाच्या उत्क्रांतीच्या क्रमाशी संबंध आहे असे सांगितले जाते. माणूस हा सृष्टीच्या क्रमात उत्क्रांत होत गेलेला प्राणी आहे. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे.  १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात हा सिद्धांत मांडण्यात आला. त्यानुसार माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाला आहे असे मानण्यात येते. माकडांचा निवास प्रामुख्याने झाडावर असतो.  याचबरोबर अनोळखी ठिकाणाची बऱ्याच जणांना भीती वाटते‌. तसेच मोठ्या जनसमुदायापुढे उभे राहून बोलण्याची भीती अनेकांच्या मनात घर करून असते. याला इंग्रजीमध्ये 'स्टेज फियर' असे म्हटले जाते तर मराठीमध्ये यालाच 'सभाधीटपणा नसणे' असे म्हटले जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती माणसाच्या मनात असतात.        ( चार्ल्स डार्विन यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )   ...

महामानवाची करूणा

Image
         'सर्वांभूती ईश्वराचा अंश आहे' असं सांगणाऱ्या संस्कृतीनेच माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले हा केवढा मोठा विरोधाभास! हा विरोधाभास दुःखद, अन्यायकारक आणि संतापजनकही आहे. परंतु चालत आलेल्या रुढीला मोडता कसा घालायचा म्हणून हा अन्याय सहन करणाऱ्यांनी देखील तो जवळपास निमुटपणे सहन केला. केवळ आर्जवं केली. संत चोखामेळा यांच्या अभंगात 'उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही याती हीन' अशा प्रकारची हतबलता केवळ व्यक्त केली. परंतु या अन्यायकारक परिस्थिती विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज म्हणून तर अपमानित जिणं पिढ्यानुपिढ्या वाट्याला आलं होतंच. परंतु बाबासाहेब दहा वर्षांचे असताना साताऱ्याहून कोरेगावला वडिलांना भेटायला जाताना जो शून्य माणुसकीचा अनुभव त्यांना आला त्याने त्यांचा अंगभूत स्वाभिमान खडबडून चेतवला. रूढींच्या जुलमी साखळदंडांनी पाय जखडलेले असतानादेखील                                                      ...

सामाजिक समरसतेसाठी आचरणात आणण्याच्या गोष्टी

Image
          कै. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा' या गीतामध्ये उल्लेख असा आहे की: 'घेता रामनाम होय पापक्षय, पुण्याचा संचय पुण्यक्षेत्री.' मी विचार करत होतो की वैयक्तिक आयुष्यात तर कमी-अधिक प्रमाणात काही चुका आपल्या हातून घडतात,  कोणाच्या हातून पाप देखील घडतं. पण समाज म्हणून आमच्या हातून काही पाप घडलंय का हो? तर विचार करताना माझ्या मनात लक्षात असं आलं की होय, आपण हे मनापासून मान्य केलं पाहिजे की समाज म्हणून आमच्याकडून पाप घडलेलं आहे. आणि ते एक-दोन दिवस नाही, एक-दोन वर्ष नाही, १००-२०० वर्ष नाही, जवळपास हजार-दोन हजार वर्ष आम्ही या देशामध्ये ते पाप करत गेलो. कोणी केलं, का केलं, त्याला जबाबदार कोण, हा सगळा विषय आपण चर्चेचा म्हणून अभ्यासकांच्यावर, विद्वानांच्यावर सोडून देऊयात. परंतु हो, आम्ही हे पाप केलंय हे आपण पहिल्यांदा मनामध्ये समजून घेऊया. ते पाप असं केलंय की 'आम्ही माणसाला माणूस म्हणून म्हणण्याचं नाकारलं'. दुर्दैवानं ते आमच्या पूर्वजांच्या हातून घडलं.                  ( छायाचित्र कृत्रिम बुद्...