भारताचे ध्येय
Up, India, and conquer the world with your spirituality! -Swami Vivekananda Lectures from Colombo to Almora स्वामी विवेकानंद यांनी भारतापुढे आपल्या ध्येयाची स्पष्ट कल्पना मांडली आहे. आध्यात्मिकतेच्या आधारावर सर्व जगावर विजय हेच ते ध्येय. कैक हजार वर्षांपासून आपल्या देशामध्ये आध्यात्मिकतेचा प्रवाह अखंडपणे वाहत आलेला आहे. अध्यात्मिक कथेचे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग असे विविध मार्ग आपल्या देशामध्ये सांगितले गेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने गेल्यास अंतिम सत्याची, ईश्वराची प्राप्ती होते हे नि:संदिग्धपणे वारंवार सांगितले गेले आहे. या मार्गांपैकी ती भक्तिमार्गाची अखंडित परंपरा आहे. अनन्यभावाने ईश्वराला शरण जाऊन त्याची भक्ती करण्यासाठी नवविधा भक्ती सांगितली गेली. भक्त लक्षणे सांगताना संत तुकाराम म्हणतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनी ॥१॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥धृ॥ निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काहीच साकडे पडो नेदी ॥२॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भय नरका जाणे ॥३॥ महाराष्ट्रामध्ये विविध संप्रदायांच्या भक्ती पर...