विसरणारा मी
मध्यंतरी एका कार्यक्रमात एका वकिलांची भेट झाली. मी त्यांना माझी ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले, ' मी तुमच्या घरी येऊन गेलो आहे.' पण मला काही आठवले नाही. नंतर त्यांनी तपशील सांगितल्यावर मला लक्षात आले. माझ्याबाबतीत असे हल्ली तर बरेचवेळा होते. मला माणसांची नावे, तपशील विसरायला होतो. गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी बऱ्याच वेळा गंमतीने म्हणतो, 'माझी मेमरी व्होलटाइल आहे. ( संगणकातील तात्पुरत्या माहितीच्या साठ्याला व्होलटाइल मेमरी म्हणतात.) नाव परत विचारले तर रागावू नका.' एकदा तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला मी म्हटले, ' अरे तास आहे आत्ता.' तो म्हणाला, 'सर, मी बारावी झालो आता.' बऱ्याच वेळा मी नावे विसरतो, एकाच्या नावाने दुसऱ्या विद्यार्थ्याला हाक मारतो. अशीही गडबड होते. तरी हजेरी घेऊन मी नावांची उजळणी करत असतो. शाळा , महाविद्यालयातील सोबती, गावचे लोक, संघाचे वेगवेगळ्या ठिकाणी सोबत काम केलेले, करणारे स्वयंसेवक यांचीही ना...