मनातलं जनासाठी भाग ५ व्यसनाधीनतेचा प्रश्न
आज मुर्डी जरा गंभीरच होते. e ग्रुपच्या हाय-हॅलो देखील त्यांनी जेमतेम प्रतिसाद दिला. त्यावेळी निधीने विचारले, " काय अंकल काय झाले?" मुर्डी यांनी तर दिले," अगं, एका गंभीर प्रश्नाचा मी विचार करत होतो तेव्हा मला आठवण झाली ती संत गाडगेबाबांची." " अंकल हे गाडगे बाबा कोण आणि त्यांनी नेमकं केलं काय?" विजयंत म्हणाला. मुर्डी सांगू लागले, " मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्रात लक्षणीय समाजकार्य केलं अशा महान व्यक्तींच्या नामावळीत संत गाडगेबाबा यांचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. प्रचलित शिक्षणव्यवस्थेत शिक्षण न घेताही जीवनाचा खरा अर्थ जगून दाखवणारे गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तीच आहेत.साधारणपणे त्यांची आठवण काढली जाते ती स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने. स्वच्छता हा गाडगेबाबांचा कार्याचा विषय होताच.पण आजकाल त्यांची आठवण मला होते ती त्यांच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा शिकवणुकीमुळे. गाडगेबाबांच्या मोठया मुलीचा जन्म झाला तेव्हा तिच्या बारशाच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावेळच्या त्यांच्या समाजात रूढ असलेल्या पद्धतीप्रमाणे आलेल्या लोकांना दारू पाजायला ठामपणे नकार दिला. आपल्य...