मनातलं जनासाठी भाग ९ कलेची चोरी
उत्सवाचे धामधुमीचे दिवस चालू होते. बोस्टन काऊंटीमध्ये एकच लगबग सुरू होती. ई गृपही अगदी मन लावून सगळ्यात सहभागी होत होता. तयारी जोरात चालली होती. सगळे एकत्र जमले होते तेव्हा एकदम विजयंत म्हणाला, " कसले चीप आहेत लोक! आपली आयडिया ढापली." " हो ना. स्वतःला काही नवीन विचार करायला नको. त्यामुळे आपलं आयतं मिळालं ते उचललं. " रमोला उद्गारली. " काय रे, काय एवढे चिडलायत? " प्रफुल्ल मुर्डींनी विचारले. " बघा ना अंकल, आमच्या आयडियाची उचलेगिरी करून काम चालू आहे ह्या शेजारच्या लोकांचं." मनोजने उत्तर दिले. " आम्ही ठरवलं काय सजावट करायची. ते कुठून तरी या लोकांनी पाहिलं आणि लगेच कॉपी केली. " निधी बोलली. " इतका राग आलाय ना या लोकांचा. काय करू नी काय नको असं वाटतंय." सानिया म्हणाली. आता एकूण रागरंग मुर्डींच्या लक्षात आला. ते म्हणाले, " अरे मित्रांनो ही तर कल्पनेची चोरी झाली. हे होत आलंय. पैशांची, दागदागिन्यांची चोरी करणारे तर अनेकजण आहेत. पण कलेची चोरी करणारेदेखील काही जण असतात." आता ई गृप लक्ष देऊन ऐकू लागला. " कलेची चोरी...