शब्द प्रयोगांच्या गमतीजमती
मध्यंतरी एका शैक्षणिक बैठकीत असताना बरोबरच्या एका उद्योजकांना त्यांच्या कारखान्यातून वारंवार फोन येत होते. बैठक संपल्यानंतर ते म्हणाले, " तिकडे आग लागली आहे!".असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळ्यांना एकदम धक्का बसला. मग लक्षात येऊन मी म्हणालो, " आग लागली म्हणजे काहीतरी तातडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. शब्दश: अर्थ घेऊ नका." मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं. बरेच वेळा चर्चा करताना शब्द, वाक्प्रयोग यामुळे गडबडी होतात. त्यामुळे एका विचारवंतांने म्हटले आहे, " चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आपण व्याख्या निश्चित करूया." असे झाले नाही तर घोटाळे होतात. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थिनी बाहेर एकेठिकाणी जाते असे सांगून दुसरीकडे गेली होती. हे नंतर लक्षात आल्यामुळे तिच्या वडिलांना मी भेटायला बोलावले. मी त्यांना म्हणालो, " तुमची मुलगी परवानगी एके ठिकाणची घेऊन भलतीकडेच गेली होती." भलतीकडे असं मी म्हणताच ते रागावले. आमच्या सातारा जिल्ह्यात 'भलतीकडे' हा शब्द 'दुसरीकडे' या अर्थानेही ...