रामायणावरील दिनदर्शिका आणि चित्रफीत निर्मितीची गोष्ट
५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर होत असताना भारतात आणि जगभरात श्रीराम भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. त्यातील एक होते श्री सतीशजी, श्री. श्रीरंग, श्री. मुकुंद हे कुलकर्णी बंधू आणि त्यांच्या भगिनी सौ. उमा सामंत . मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हई या गावातील असलेल्या कुलकर्णी कुटुंबीयांनी आपला मोठा उद्योग उभा केला आहे. औद्योगिक जगताबरोबरच सामाजिक कार्यातदेखील हे कुटुंब अग्रेसर आहे. कुलकर्णी कुटुंबांमध्ये रामभक्ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांनी किन्हईतील श्रीराम पट्टाभिषेक मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी केला आहे. श्री. सतीशजी कुलकर्णी आणि त्यांचे बंधू यांचे भरघोस सहकार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नियमितपणे होत असते. ( दिनदर्शिकेचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यांचे छायाचित्र ) २०२० मध्ये श्री. सतीश कुलकर्णी यांनी रामायणावर आधारित एक दिनदर्शिका बनवायची आहे असा आपला मानस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांच्या कानावर...