छ. शिवराय : तीन गुण

छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखे व्यक्तिमत्व हजारो वर्षातून एकदा जन्माला येते. जनसामान्यांना आश्चर्यचकीत करून सोडणारे अद्भुत जीवन जगून जाते. त्यांचे आयुष्य जणू चमत्कारच भासतो. चमत्काराला नमस्कार करण्याची स्वाभाविक मानवी वृत्ती असल्यामुळे जयजयकार हा मुखातून आपसूक उमटतो आणि घोषणा बाहेर पडते, छत्रपती शिवाजी महाराज की जय! परंतु सामान्य व्यक्तीकडे रोजच्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्यासारखे धैर्य ,युक्ती ,बुद्धी अभिनव कल्पना , उत्तुंग ध्येय या आणि अशा अनेक गुणांसारखे गुण आचरणात आणण्याची संधी सहसा मिळत नाही. परंतु शिवरायांचे काही गुण असे आहेत की जे सर्वांना रोज आचरणात आणता येतील. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) यापैकी पहिला गुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी धार्मिक वृत्ती! अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी साक्षात् भवानी मातेचा दृष्टांत आपल्याला झाला आहे या उद्गारांनी त्यांनी आपल्या सवंगड्यांना प्रेरित केले. देशभर ज्याच्या पराक्रमाची क्रौर्याची कीर्ती होती त्या अफजलखानाला यमसदनाला पाठवून स्वराज्या...