महात्मा बसवेश्वर : मानवी मूल्यांचा आग्रह

' हे जग असे का आहे?' असे विचारणाऱ्यांनी जगात बदल घडवून आणले आहेत. पण ' हे जग असे का नाही?' असे विचारणाऱ्या माणसांनी जगात जास्त बदल घडवून आणले आहेत. अशाप्रकारे बदल घडवून आणणाऱ्या महान व्यक्तींमध्ये महात्मा बसवेश्वर स्वतःच्या आगळ्या कर्तृत्वाने, तेजाने , विचारांनी, कार्याने उठून दिसतात. काल पटलावर त्यांनी स्वतःची ठसठशीत नाम मुद्रा उमटवली आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) पृथ्वीवर मानवी जीवनाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात भटकणारा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू स्थिर झाला. त्यातून समाजांची निर्मिती झाली. जगभर सर्व समाजांमध्ये काळाच्या ओघात वेगवेगळ्या प्रकारचे भेद निर्माण झाल्याचे आढळते. कालांतराने हे भेद दृढमूल झाले. हे भेद मोडण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला. महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य सनाच्या १२ व्या शतकामध्ये मंगळवेढा (जि. सोलापूर, महाराष्ट्र) , कूडलसंगम, बसवकल्याण (जि. विजयपूर ,कर्नाटक) या सीमावर्ती भागात घडले. १२ व्या शतकात एकूणच हिंदू समाजाला जातीभेद ,अस...