राष्ट्रपती भवन वर्णन
" ३४० एकड परिसर में फैले हुए राष्ट्रपती भवन में ३४० कमरे हैं।" राष्ट्रपती भवनातील आमची मार्गदर्शिका सांगत होती. गुरुवार दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ला मा.राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांची भेट संपवून आम्ही निघत असताना त्यांनी स्वतःहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आम्हाला राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था करा. थोड्या वेळात आमच्यासाठी मार्गदर्शिकेची व्यवस्था करण्यात आली आणि आम्ही राष्ट्रपती भवनाची फेरी सुरू केली. तत्पूर्वी आम्ही राष्ट्रपती भवनाच्या ३७ क्रमांकाच्या दरवाज्यातून आत येतानाच त्या वास्तूची भव्यता जाणवत होती. तळमजल्याचे छत जवळपास २५ फूट उंच होते. लालसर दगडात बांधलेले गोल स्तंभ, कॉरिडॉरमधील अर्धवर्तुळाकार छत, जाताना काही खांबावर कोरलेले भगवद्गीतेतील श्लोक हे त्यांची छाप पाडत होते. मोबाईल सुरक्षा अधिकाऱ्यांनी जमा करून घेतल्याने आमच्याकडे फक्त जगातील सगळ्यात भारी कॅमेरा होता तो म्हणजे आमच्या डोळ्यांचा. त्या डोळ्यांनी ती भव्यता, ते वास्तू सौंदर्य आम्ही साठवून ठेवत होतो. आमच्या मार्गदर्शिकेने आमच्या फेरीत माहिती सांगण्याची स...