स्मरण विस्मरण
काही प्रसंग, घटना, गोष्टी घडतात त्यावेळी खूप महत्त्वाच्या वाटतात त्यावेळी त्या लक्षात राहतात. परंतु काही दिवसानंतर अशा गोष्टी विसरल्या जातात. घडताना महत्त्वाच्या वाटलेल्या प्रसंगांची नंतर कोणीतरी आठवण करून देते पण त्याची आठवण येतेच असे नाही. मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते पंकज कपूर यांची एक मुलाखत पाहत होतो. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीची तयारी करताना पंकज कपूर यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी चर्चा करून प्रश्न काढलेले होते. त्यात एक प्रश्न असा होता की , "बऱ्याच वर्षांपूर्वी पंकज कपूर यांनी बसमध्ये भिकाऱ्याचे सोंग वठवून सर्वांना चकित करून सोडले होते." हा प्रसंग मुलाखतकाराला पंकज कपूर यांच्या भावाने सांगितला होता. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर पंकज कपूर म्हणाले, " मला यातले काहीही आठवत नाही." मुलाखतकाराने भावाचे नाव घेऊन हा प्रसंग त्यांच्याकडून कळल्याचे सांगितले पण तरीदेखील पंकज कपूर यांना तो प्रसंग काही पाठवला नाही. मोघमपणे ते एवढंच म्हणाले की , "असं घडलेलं असू शकतं ."त्यांच्या उत्तरावरून त्यांना हा प्रसंग आठवला...