Posts

Showing posts from February, 2026

चहाच्या निमित्ताने....

Image
       गरम चहाचा कप पाहून मला अनेक वेळा कै. सुनीलराव खेडकर यांची आठवण येते. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्याबरोबर मी आधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि नंतर संघाच्या पुणे महानगर कार्यकारिणीत काही वर्षे काम केले. ते म्हणत असत की, "मला अगदी उकळत असलेला चहा ताबडतोब आणून द्या अगदी कढत चहा हवा." एवढा कढत चहा पिणारे ते मी पाहिलेले एकमेव व्यक्ती. याउलट काही जणांना चहा थंड झाल्यावर पिण्याची सवय असते. चहा थंड होऊ लागला की त्याच्यावर साय धरते. मला ती आवडत नाही. म्हणून अनेकवेळा मीटिंगमध्ये चहा आणून दिला की सांगून मी गरम चहा घेत असतो.       चहाचा विषय निघाला की हमखास वाक्य आठवते ते म्हणजे "चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो." पूर्वी फक्त चीनमध्ये आढळणारा चहा ब्रिटिश कंपन्यांनी भारतात पद्धतशीरपणे रुजवला.  आता भारतात चहाचा खप प्रचंड होतो. भारतीयांनी चहाची स्वतःची पद्धत शोधून काढली. चहाच्या निमित्ताने नेहमी आठवते ती इतिहासाच्या पुस्तकात शिकलेली बोस्टन टी पार्टी इंग्रजांच्या दडपणाला जुगारून देऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या लोकांनी ब...

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवनकार्य

Image
      नाचविता ध्वज तुझा गुंतले शृखंलेत हात       बद्ध करांनी तुज करिती अखेरचा प्रणिपात कवीवर्य कुसमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध 'गर्जा जयजयकार ' या कवितेतीतील या ओळी  ४ नोव्हेंबर १८४५ यादिवशी जन्मलेल्या आणि १७ फेब्रुवारी १८८३ यादिवशी मृत्यू पावलेल्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनाला शब्दशः लागू पडतात. आपला अखेरचा श्वास भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एडन येथील कारागृहात घेताना त्यांनी भारतमातेला विनम्र भावाने प्रणाम केला ही गोष्ट अक्षरशः खरी आहे.                           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          धूर्त इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येऊन आपले बस्तान बसवले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. पारतंत्र्याच्या दीर्घ काळरात्रीची सुरुवात झाली. इंग्रजी राज्य आपल्यासोबत प्रामुख्याने इंग्रजी राज्य स्थिर राहावे यासाठी विविध आधुनिक सुधारणा घेऊन आले. भारतात प्रचलित असलेल्या दुष्ट रुढी परंपरा यांनादेखील या राज्याने हादरवून सोडले. क...

पांडुरंगाला राखी

Image
                           कथा           गोविंद नेहमीसारखा आनंदाने कार्यालयात शिरला. प्रत्यक्ष पांडुरंगांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे याचा त्याला फार आनंद झाला होता. तसे फार दिवस झाले नव्हते. नोकरी सुरू होऊन दोन तीनच महिने  झाले होते. पण पांडुरंग देवस्थानात नोकरी करायला मिळताना गोविंद थोडासा खट्टू झाला होता. गाभाऱ्याजवळ नोकरी असावी ही त्याची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे कामावर असताना 'सावळे सुंदर रूप मनोहर' असणाऱ्या विठ्ठलाचे सदोदित दर्शन घडत राहावे ही त्याची मनोमन इच्छा होती. पण हरकत नाही. देवाची सेवा तर घडतीय असं म्हणत त्यानं आपलं समाधान करून घेतलं होतं. कामावर आल्यानंतर आणि घरी परतताना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हा परिपाठ तो आचरू लागला.                               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        देवस्थानच्या कार्यालयात राहून पत्रव्यवहार...

कर्तव्यपूर्ती

Image
                                   कथा             दिवस मावळतीला चालला होता. हळूहळू अंधार वाढत चालला होता आपल्या कुटीमध्ये बसलेल्या मेधानंदाना आता दिवा लावावा याची जाणीव झाली. परंतु मन एका अनिर्वचनीय आनंदाने भरून गेले होते. आज आपल्या हातून कर्तव्याची पूर्ती झाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. यापूर्वी कधी न अनुभवलेले समाधान ते अनुभवीत होते. त्यामुळे अगदी निश्चल अवस्थेत ते बसून राहिले.                ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )      किती काळ गेला हे सांगता येत नव्हते. पण थोड्यावेळात कुटीच्या दरवाजात दिवा घेऊन वल्लरी आली. दिव्याच्या मंद तेजामध्ये तिचा चेहरा उजळला होता. दिवा घेऊन ती आतमध्ये प्रवेश करती झाली. याची जाणीवदेखील मेधानंद यांना झाली नाही. ती देखील अद्भुत दृश्य पहावे अशा भावनेने पाहू लागल. एकदम निश्चल बसलेल्या मेधानंद यांनी आपले नेत्र मिटले होते. प्रकाशाची जणू जादू होऊन ...