चहाच्या निमित्ताने....

       चहाचा कप पाहून मला अनेक वेळा कै. सुनीलराव खेडकर यांची आठवण येते. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्याबरोबर मी आधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि नंतर संघाच्या पुणे महानगर कार्यकारिणीत काही वर्षे काम केले. ते म्हणत असत की, "मला अगदी उकळत असलेला चहा ताबडतोब आणून द्या अगदी कढत चहा हवा." एवढा कढत चहा पिणारे ते मी पाहिलेले एकमेव व्यक्ती. याउलट काही जणांना चहा थंड झाल्यावर पिण्याची सवय असते. चहा थंड होऊ लागला की त्याच्यावर साय धरते. मला ती आवडत नाही. म्हणून अनेकवेळा मीटिंगमध्ये चहा आणून दिला की सांगून मी गरम चहा घेत असतो.


               ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

      चहाचा विषय निघाला की हमखास वाक्य आठवते ते म्हणजे "चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो." पूर्वी फक्त चीनमध्ये आढळणारा चहा ब्रिटिश कंपन्यांनी भारतात पद्धतशीरपणे रुजवला.  आता भारतात चहाचा खप प्रचंड होतो. भारतीयांनी चहाची स्वतःची पद्धत शोधून काढली. चहाच्या निमित्ताने नेहमी आठवते ती इतिहासाच्या पुस्तकात शिकलेली बोस्टन टी पार्टी इंग्रजांच्या दडपणाला जुगारून देऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या लोकांनी बोस्टनच्या बंदरात चहाच्या पेट्या ओतून दिल्या होत्या त्याला बोस्टन टी पार्टी असेल संबोधन मिळाले आहे मध्यंतरी आमचे एक स्नेही अमेरिकेला बोस्टन मध्ये राहून आले मी त्यांना गमतीने म्हणालो, " मग बोस्टन टी पार्टी झाली की नाही?" तेही हसून हो म्हणाले. 

      काही महिन्यांपूर्वी आमच्या म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी शिबिरात गेलो होतो. शिबिरातील विद्यार्थी त्यांचे गावातील अनुभव सांगत होते. यावेळी मी त्यांना विचारले , "कोरा चहा प्यायला की नाही?" परंतु आता गावामध्येही दूध मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे कोरा चहा पिण्याची वेळ शक्यतो येत नाही. या प्रसंगांनी माझी आठवण जागी झाली. १९९० ते १९९४ या वर्षात मी साताऱ्यामध्ये शिकत असताना संघाच्या 'सेनापती सायम्' या शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून काम करत होतो. साधारण १९९१ हे वर्ष असेल. एके दिवशी शाखा सुटल्यावर शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांच्या घरी गेलो होतो. कांबळे सामडे कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्या बांधवांची ती वस्ती होती त्या स्वयंसेवकाच्या घरी गेल्यानंतर चहा आला तो कोरा चहा होता आयुष्यात त्यादिवशी मी पहिल्यांदाच कोरा चहा प्यायलो अत्यंत आपुलकीने दिलेला तो चहा कायम स्मरणात राहील. आता हेल्दी टी म्हणून काहीजण कोरा चहा पीत असतात.

      चहा आणि कॉफी ही दोन पेये लोकप्रिय आहे साधारणपणे कॉफी घेणारे लोक फक्त कॉफीचं पितात ते कधीही चहा घेत नाहीत. घेणारे मात्र साधारणपणे कॉफी घेत असतात आतापर्यंत मी मोजकेच लोक असे पाहिले की ते घेतला तर फक्त चहाच घेतात कॉफी घेत नाहीत त्यापैकी एक जड छत्रपती संभाजी नगर येथे असतात ते उद्योजक आहेत ते मनात द्यायचा असेल तर चहाच द्या अन्यथा काही नको माझ्या ओळखीचे एक प्राध्यापक देखील फक्त चहाच यायचे काही महिन्यांपूर्वी त्यांना भेटलो तेव्हा मात्र त्यांनी कॉफी मागवली त्यावेळी मी त्यांना म्हणालो काय सर आज कॉफी कशी काय घेतली त्यावेळी ते म्हणाले काही औषध चालू असल्यामुळे सध्या कॉफी घ्यायला सांगितली आहे थोडे आश्चर्य वाटले कारण साधारणपणे होमिओपथी औषध चालू असेल तर कॉफी न पिण्याचे पद्य पाळावे लागतील पण येथे डॉक्टरांनी कॉफी प्या असे सांगितले होते.

       शंकर नावाचे एक बंगाली लेखक आहेत. त्यांनी 'अज्ञात विवेकानंद ' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी स्वामी विवेकानंद यांना कॉफीपेक्षा चहा आवडे असे लिहिले आहे. ते वाचून मला बरे वाटले की 'स्वामीजींचे एक वैशिष्ट्य आपल्यात आहे.'

      मी शाळेत शिकत असताना आम्हाला राजा मंगळवेढेकर यांचा एक धडा होता. त्यात त्यांनी आनंदी राहण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली म्हणजे जाग. आली की अंथरुणावर काही वेळ पडून राहून पक्षांचा किलबिलाट ऐकणे. दुसरे घाईगडबडीत न जाता थोडे लवकर निघून थोडा वेळ इतरांची धांदल बघणे. तिसरे म्हणजे 'सकाळचा पहिला चहा स्वतः करून घेणे‌  स्वतः केल्याने आपल्या आवडीनुसार चहा करता येतो. चुकून बिघडलाच तर फार चिडचिड होत नाही.' आनंदी राहण्याच्या या  गोष्ट सोप्या आहेत. यातील आपल्या आवडीचा चहा म्हणजे एका बाजूला काही जणांचा कमी पत्ती, कमी उकळलेला, भरपूर दुधाचा तर काही जणांचा जास्त पत्ती, जास्त उकळलेला, कमी दुधाचा असा दुसऱ्या टोकाला यातला आपापल्या आवडीचा चहा.

           चहावरचा हा लेख वाचून चहाची तलफ आली असेल तर लगेच चहा घ्यायला हरकत नाही. कसे काय?

सुधीर गाडे, पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

उत्तराखंड सहलीतील अनुभव

गुजरात सहल