पुस्तक परिचय : ग्रीकपुराण
ग्रीकपुराण लेखिका सुप्रिया सहस्रबुद्धे रोहन प्रकाशन पुणे काही दिवसांपूर्वी हे पुस्तक वाचून पूर्ण केले. प्राचीन जगात ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. त्यातील काही संदर्भ विशेष नामे अजून देखील वापरले जातात. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी पॅंडोरा पेपर्स, पेगासिस सॉफ्टवेअर यांची चर्चा झाली यातील पॅंडोरा, पेगासिस यांच्या कथा प्राचीन ग्रीक साहित्यात आढळतात. असे अनेक संदर्भ आजदेखील वापरले जातात. अशा संदर्भांची माहिती होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक चांगले आहे. ज्यामध्ये देवांचा राजा झ्यूस , त्याची भावंडे पॉसिडॉन, हेडीज यांच्या बरोबरच झ्यूसची बहीण आणि पत्नी हेरा , युद्धकौशल्य आणि शहाणपणाची देवताअथीना , प्रेमदेवता ॲफ्रोडिटी, कृषीदेवता डिमीटर, आनंदाचा देव डायोनिसिस उषा अनेक देवदेवतांच्या कथा तसेच वीर व्यक्तींच्या कथा दिलेल्या आहेत. यातील काही विलक्षण कथा वीर हेरॅक्लीस, अकिलीस, स्वत:चा मुलगा पेलॉप्स याला मारून त्याचे मांस देवांना वाढल्याने झाडाखाली पाण्यात उभे राहून पाणी न पिऊ शकण्याची आणि फळ न खाऊ शकण्याची शिक्षा मिळालेला टॅन्टॅलस, आतिथ्यधर्माचा भंग केला म्हणून...