सरसकट विशेषण
" जेवण काय सुंदर झाले." माझ्या परिचयातील एकजण म्हणत होता. हल्ली बरेच वेळा ' सुंदर ' हे विशेषण सरसकटपणे वापरले जाते असे माझ्या लक्षात आले आहे. बरेच जण म्हणत असतात. " भाषण फार सुंदर झाले." " लेख अतिशय सुंदर होता. ", " सुंदर प्रसंग" , "सुंदर सहल झाली." अशी काही उदाहरणे सांगता येतील. पण योग्य त्या ठिकाणी योग्य ते विशेषण वापरणे आवश्यक आहे असे वाटते. जेवणाबाबत बोलायचे असेल तर ' चविष्ट' , 'रूचकर' ही विशेषणे अनुरूप आहेत. भाषण लेखन याबाबत 'प्रभावी' , ' माहितीयुक्त', ' प्रेरणादायक ' अशी विशेषणे वापरता येतील. ' सुंदर ' हे विशेषण चित्र, छायाचित्र, व्यक्ती यांच्यासाठी वापरणे योग्य राहील असे वाटते. यात एक छोटी गोष्ट करता येते ती म्हणजे ' छान' , ' मस्त' ही विशेषणे मात्र सगळीकडे वापरता येऊ शकतात. सरसकट एकच विशेषण सगळीकडे वापरण्याचे कारण म्हणजे भाषा चांगल्या पद्धतीने समजलेली ( अवघड शब्द ' आत्मसात केलेली ' ) नसणे हे आहे असे मला वाटते. तसेच भाषेचा वापर फक्त ...