खेळ नियतीचा
( काल्पनिक कथा ) कागदावर लिहिलेल्या गोळ्यांचं नाव आणि संख्या वाचून औषधांच्या दुकानदारानं मोठ्या आवाजात विचारलं " अरे तुझं नाव काय? पत्ता सांग." "सांगतो ना." असं विशाल म्हणाला. तेवढ्यात त्याची नजर दुकानदाराच्या चेहऱ्यावर गेली आणि त्याच्या हातातील कागद पेनदेखील विशालने पाहिला. काहीतरी गडबड होते आहे हे ध्यानात आले आणि त्याने लगबगीने दुकानदाराच्या हातातला औषधाचा कागद ओढला आणि तो पसार झाला. दुकानदार आपला नाव पत्ता घेऊन पोलिसांना सांगणार हे विशालच्या लक्षात आल्याने तो पसार झाला होता. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) दुकानापासून थोड्या दूर असलेल्या एका गल्लीत जाऊन तो उभा राहिला आणि काय काय झाले ह्याचा विचार करू लागला. काही दिवसांपूर्वीची आपली मनस्थिती त्याला आठवली. " संपवावं आता सगळं. " विशालच्या मनात विचार आला. एक क्षणभर तो दचकला आणि हा कसला विचार आपल्या मनात आला म्हणून चमकला. हा विचार झटकून टाकायचा प्रयत्न त्याने केला. पण हळूहळू...