सभागृहाच्या आठवणी...!

आज म.ए.सो.गरवारे महाविद्यालयाचे सभागृह पाडले गेले.२००५ मध्ये सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी या सभागृहासाठी सुयोग्य अशा संस्कृत ओळी संस्थेचे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे माजी प्रा.जे.पी. गद्रे यांनी लिहून दिल्या होत्या. त्या ओळींतील भावनांचा आशय व्यक्त करणाऱ्या पुढील ओळी या सभागृहासाठी प्रा.रामभाऊ डिंबळे यांनी लिहून दिल्या होत्या. पवित्रं प्रसन्नं गुणोत्कर्षकारी | इदं मंदिरं स्यात् वयःशक्तिपीठम् | त्या विद्यार्थ्यांना कलागुणांचा उत्कर्ष करण्यासाठी प्रेरणा देत होत्या. गेली जवळपास ७ दशके ज्या सभागृहाने विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ दिले, विविध तज्ज्ञ ,विचारवंत, अभ्यासक यांची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, आपल्या कल्पना प्रकल्प रूपाने सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, सामाजिक बांधिलकीतून चालणाऱ्या अनेक उपक्रमांचे ,घडामोडींचे, समारंभचे जे सभागृह साक्षीदार होते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील दिग्गज गायकांनी ज्या मंचावरती आपली कला सादर केली तो मंच असलेले सभागृह आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज तिथे उरला आहे फक्त ढिगा...