Posts

Showing posts from May, 2026

शाबासकीची भूक

Image
         (चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने) चांगल्या कामाला शाबासकी आणि चुकीला शिक्षा हे व्यवस्थापनशास्त्राचे मूलभूत तत्व आहे. शाबासकीने अजून चांगले काम करण्याचा हुरुप वाढतो तर शिक्षेमुळे चुकीला पायबंद घालता येतो. त्यामुळे हे तत्व सर्वत्र सर्रासपणे वापरले जाते. यातील शाबासकीची भूक माणसाला सदैव असते. या भुकीमुळे चांगले काम करण्यासाठी प्रवृत्ती होत असते. याबाबतीत मनात काही विचार येऊ लागले. बक्षीस अथवा शाबासकी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. राजेशाहीच्या काळात सोने-नाणे, दागिने, जमीन, पदवी इत्यादी गोष्टी देऊन शाबासकी दिली जात असे. रोख रक्कमदेखील देण्याची पद्धत होती.        साधारणपणे आपल्या माणसांच्या उपस्थितीत कौतुक झाले की त्याचा जास्त आनंद होतो. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सरकारच्या आणि इतर संस्था संघटना यांच्यावतीने घेतल्या जातात. त्याचे पारितोषिक म्हणून रक्कम , चषक अथवा पदक, प्रशस्तीपत्र देण्याची पद्धत आहे. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धात्मक उपक्रमांची चर्चा चालू असताना या स्पर्धेतील विजयी व्यक्तीला कोणते पारितोषिक देता येईल यावर...

पोषाख आणि सभ्यपणा

Image
       १८६२ मध्ये सुरू झालेल्या एका क्लबमध्ये एका दिवसासाठी राहण्याचा नुकताच योग आला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या विश्रांतीसाठी सुरू केलेला हा क्लब आहे. पुढे हळूहळू काही उच्चभ्रू भारतीयदेखील याचे सभासद झाले. नंतर काहीजण अध्यक्ष झाले. १९४७ नंतर अर्थातच सर्व भारतीय राहिले. ब्रिटिश स्थापत्यकलेचा नमुना असलेला हा क्लब ब्रिटिश जीवनशैलीप्रमाणेच असणार हे उघडच आहे. पण मला विशेष वाटलं की कपड्यांचे नियम विशेषतः जेवताना घालायच्या कपड्यांचे नियम तिथे आजदेखील काटेकोरपणे पाळले जातात. बदल एकच आहे तो म्हणजे भारतीय पोषाख आणि कोल्हापुरी चप्पल जेवताना घालायला परवानगी आहे. पण हा वेष तिथे येणारे कुणी घालत असतील असं मला वाटलं नाही. शर्ट पँट घालून चप्पलवर जेवायला परवानगी नाही.                (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)           पोषाखाचे हे नियम असे का केले असतील असा विचार केल्यावर वाटलं की ब्रिटिश पद्धतीचा पोषाख करणे ही एक उच्चभ्रू सभ्यपणाची खूण मानली जात असे. त्याचीच परिणिती ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी सु...

घटनात्मक लोकशाहीतील जलद न्यायासाठीची आव्हाने

Image
        काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे लहानग्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिला ठार मारण्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आला. या घटनेनंतर सर्वत्र निषेधाची, संतापाची लाट उसळली. अनेकांनी ताबडतोब न्यायाची मागणी केली. कुणी आरोपीची खांडोळी करा असे म्हटले. तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्त्रीवर अत्याचार केला म्हणून रांझे गावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला तशी शिक्षा करावी असे म्हटले. कोणीकोणी आरोपीचा एन्काऊंटर व्हावा अशी अपेक्षा केली. घडलेल्या हिडीस, नृशंस घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमनात संताप असणे अगदी स्वाभाविक आहे. लोकांना तो संताप घटनात्मक चौकटीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. ही घटना घडल्यावर लगेच दोन तीन दिवसांत पुण्यात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अशी घटना होता होता राहिली. पुन्हा समाजमन क्षुब्ध झाले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ताबडतोब व्हावी यावर विकृत माणसे वगळता कुणाचेही दुमत नाही. ...

समर्थ भारत : जवळ तरीही दूर

Image
          गेल्या काही दिवसातील अनेक बातम्यांनी मनावरती ओरखडे उमटवले. काही बातम्यांनी तर मनावरती घाव घातले. खरोखरंच आपण एक देश समाज म्हणून समर्थ होण्याच्या किती जवळ आहोत अथवा किती लांब आहोत याची जणू माहिती या बातम्यांनी दिली.                   (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)          यातील पहिली बातमी ही पुणे शहराजवळच्या शिरूर या महामार्गावरील गावामधील आहे. या बातमीनुसार वंचित समाजातील एका जोडप्यातील महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. काय करावे हे न कळून दोघेही सुन्नपणे तसेच बसून राहिले. काही संवेदनशील लोकांनी गावातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. ते पती-पत्नीदेखील तत्परतेने तिथे हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय उपचार केले. या बातमीत सर्व संबंधितांची तत्परता अभिनंदनीय आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. परंतु त्याच वेळी या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या देशात सरकारी रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात हे या जोडप्याला माहीत नव्हते का? माहित अ...