Posts

Showing posts with the label लोकसेवा परिवार

प्रवासात भेटलेले माणिककाका

Image
                      " सर, हे डॉ. माणिक शेडगे." साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शशिकांत शिंदे म्हणाले. शिंदे सरांनी नुकतीच आमच्या महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून पीएचडी पूर्ण केली आहे. सदरा पायजमा घातलेल्या व्यक्तिला मी नमस्कार केला. शिंदे सरांच्या पुढच्या वाक्याने उत्सुकता अधिक वाढली. शिंदेसर पुढे म्हणाले, "माणिककाका सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील पारधी समाजातील लोकांसाठी लोकसेवा परिवार नावाची सेवाभावी संस्था चालवतात."  काही दिवसांपूर्वी सातारा पुणे प्रवासातील हा प्रसंग. ही ओळख झाल्यावर पुढे जवळपास दीडदोन तास आमचा संवाद सुरू होता.     (डावीकडून डॉ शशिकांत शिंदे, डॉ माणिक शेडगे)                  (हे पुस्तक माणिककाकांनी मला भेट दिले.)       या संवादात मिळालेली माहिती भारावून टाकणारी होती. थक्क करून सोडणारी होती. साताऱ्यापासून जवळच असलेले अंगापूर हे माणिककाकांचे गाव. बारावीनंतर १९९० मध्ये त्यांनी सातारच्या आर्यांग्ल आयुर्...