Posts

Showing posts from June, 2026

शिक्षेचे नाना प्रकार

Image
       शाबासकीप्रमाणेच शिक्षेलाही महत्त्व आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा बजावल्या गेल्या अमलातही आणल्या गेल्या. मध्ययुगीन काळात पैशांचा दंड करणे, घरावर जप्ती आणणे, कोठडीत ठेवणे, चाबकाचे फटके देणे, हात किंवा पाय तोडणे, गुलाम करणे, शिरच्छेद करणे, कडेलोट करणे, जाळून मारणे, हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारणे, तोफेच्या तोंडी देणे यासारख्या शिक्षा होत असत. जोपर्यंत चूक , गुन्हा होत राहील तोपर्यंत शिक्षा होतच राहणार. शिक्षांची ही काही उदाहरणे.           (टॅंटलसच्या शिक्षेचे चित्र इंटरनेटवरून साभार)          ग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आज ती नामशेष होऊन केवळ संग्रहालये आणि पुस्तकात ही संस्कृती उरली आहे. ग्रीक पुराण हे जगातील प्राचीन पुराणांपैकी एक आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पुराणकथांमधील सर्वात शक्तिशाली देव म्हणजे झ्यूस. त्याने कुणाकुणाला शिक्षा दिल्याच्या कथा आहेत. त्यात टॅंटलस नावाचा एक माणूस होता. याची कथा वेगवेगळ्या प्रकारे स...