Posts

Showing posts from July, 2026

व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्याचे दोन मार्ग

Image
    प्रत्येक माणसाच्या काही अंगभूत क्षमता असतात. माणसाची स्वतःची आवड हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीवर आधारित संधी मिळणे हा एक भाग आहे. व्यावसायिक आयुष्यात जर क्षमता आणि आवड या दोन्हींशी मेळ घालणारी संधी मिळाली तर ते व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.            व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी दोन मार्ग आहेत असे वाटते. एक म्हणजे जे आवडते ते करणे किंवा जे करतोय ते आवडून घेणे. ह्यापैकी कोणताही एक मार्ग निवडला तरच समाधान मिळते. अन्यथा असमाधान राहते. माणूस कुढत बसतो. याबाबतील दोन उदाहरणे पुढे लिहिली आहेत. दोनही उदाहरणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीशी(म.ए.सो.शी) संबंधित आहेत.          (डॉ श्रीराम लागू यांची छायाचित्रे इंटरनेटवरून साभार) मध्यंतरी दिवंगत अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांचे आकाशवाणीवर व्यक्त केलेले मनोगत ऐकायला मिळाले. डॉ लागू हे म.ए‌.सो.च्या भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. पुढे पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते नाट्य क्षेत्राकडे ओढले गेले. शिक्षण सुर...

दोन अभिनेत्रींच्या सासवांचे ऋण

Image
           सामान्य माणसाच्या आयुष्यात बदलाचे काही टप्पे ठरलेले असतात. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय आणि लग्न. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातील लग्न हा टप्पा विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण लग्नानंतर तिला आपले घरदार सोडून पतीच्या घरी जावे लागते. लग्नाच्या नात्याने अनेक नवीन माणसे जोडली जातात. त्यापैकी एक नातं हे सासू आणि सुनेचं आहे.        सासू सुनेचे नातं हा एक नाजूक, गुंतागुंतीचा विषय आहे. बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या जीवन आकळलेल्या कवयित्री म्हणतात ऐक ऐक रे योग्या काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. सासुरवासाने त्रासलेल्या मुलीचा चार दिवस माहेरी सुखाचा अनुभव यावा यासाठी तिची आई सासुरवास सोसत राहते असे बहिणाबाई सुचवतात.  याचबरोबर काहीजण गंमतीने सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नकोत अशाप्रकारे सांगताना दिसतात.        विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात सासरी छळ होऊन मरण पावलेल्या किंवा आत्मह...

पुरणपोळीचे जेवण

Image
                           (कथा)  "अगं, ऐकलंस का?" कमलाकरपंतांनी हाक मारली. "काय हो?" लक्ष्मीबाई उत्तरल्या.  "अगं, उद्या रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक कर. आपल्याकडे पाच सहाजण जेवायला येणार आहेत." "करते. पण कोण आहेत मंडळी?" "आपलीच माणसं! विश्वनाथदादा, उमाबाई, आपल्या दोघांकडचे वकील आणि स्वतः न्यायाधीशसाहेब येणार आहेत."                  (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)        कमलाकरपंतांचं हे बोलणे ऐकले आणि लक्ष्मीबाई एकदम गंभीर झाल्या. शांतच राहिल्या. कारणही तसेच होते.           तसं म्हटलं तर कमलाकरपंत तालुक्याच्या या गावी परकेच होते. नशीब काढायचं म्हणून आपलं छोटं गाव सोडून बाहेर पडले. एकदोन ठिकाणी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यातूनच विश्वनाथदादा यांच्याशी ओळख झाली आणि या गावात आले. त्यालाही आता जवळपास १५ वर्षे होत आली होती. इथं आले तेव्हाच कमलाकरपंतांनी आपला व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू केला हो...

डोक्यावरील केस आणि पण(प्रतिज्ञा)

Image
         डोक्यावरील केस ही माणसाची ओळख. विविध प्रकारची केशभूषा ही तर हजारो वर्षांपासून माणूस करत आला आहे. या केसांशी संबंधित काही पण(प्रतिज्ञा) या लेखात वाचायला मिळतील.         भारताच्या इतिहासातील सर्वात जुना उल्लेख आढळतो आर्य चाणक्य यांचा. मगधाचे शक्तिशाली साम्राज्य नंद घराण्याचे होते. सामर्थ्यबरोबर अहंकारही वाढीला लागला. या अहंकारातूनच राजा धनानंद याने आर्य चाणक्य यांचा अपमान केला. अतिशय बुद्धिमान आणि निस्पृह चाणक्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी भर दरबारात पण उच्चारला की, "जोपर्यंत उन्मत्त धनानंदाला सिंहासनावरुन खाली खेचत नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही." या पणाची पूर्तता झाली ती चंद्रगुप्त मौर्य हा पराक्रमी योद्धा राजसिंहासनावर आरुढ झाल्यावर. या मौर्य घराण्याने प्राचीन इतिहासात भारताच्या सर्वाधिक मोठ्या भूभागावर जवळपास दोन शतक सत्ता गाजवली.         राजकारणातील हा पण आध्यात्मिक क्षेत्रातही पहायला मिळतो. भारतातील एक अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे तिरुपती येथील श्री बालाजी ह...