अक्षरधाम मंदीर दिल्ली
ऑक्टोबर २०१७ मध्ये दिल्लीला गेल्यावर आवर्जून भेट दिली ती अक्षरधाम मंदिराला. दुपारी एकच्या सुमारास मंदिरात पोचलो. सुट्टीचा वार नसतानाही मंदिरात चांगली गर्दी होती.आत जाताना मोबाइल, पुस्तक इ.सर्व साहित्य जमा केलं. विशेषतः मोबाइल जमा केल्यामुळे आता एका नव्या अनुभवाचा निर्विघ्न आनंद घेता येणार होता.या आंनदानुभवाचं हे वर्णन. ( छायाचित्र सौजन्य विकिपीडिया Copyright held by BAPS Swaminarayan Sanstha (web: www.baps.org, email: info@baps.org) १०० एकर परिसरात हजारो कारागिरांनी काही वर्षे खपून भारतीय संस्कृतीचे हे मनोहर शिल्प उभं केलं आहे.ते बघताना काही किलोमीटर पायपीट ही होतेच.त्यात आनंद आहे.( ज्यांना चालण्याची अडचण आहे त्यांच्यासाठी चाकाची खुर्ची उपलब्ध करून दिली जाते.ढकलणारे खंबीर लोक बरोबर हवेत.) आवश्यक अशा सुरक्षातपासणीतून आत गेल्यावर काय बघू आणि काय नको असं वाटेल इतकं आत बघण्यासारखं आहे.तिथल्या छोट्या माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे जायचं तर सुरुवातीला दहा दिशांची प्रतीकं म्हणून दशद्वार आहेत.त्या कमानीस...