दोन अभिनेत्रींच्या सासवांचे ऋण
सामान्य माणसाच्या आयुष्यात बदलाचे काही टप्पे ठरलेले असतात. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय आणि लग्न. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातील लग्न हा टप्पा विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण लग्नानंतर तिला आपले घरदार सोडून पतीच्या घरी जावे लागते. लग्नाच्या नात्याने अनेक नवीन माणसे जोडली जातात. त्यापैकी एक नातं हे सासू आणि सुनेचं आहे.
सासू सुनेचे नातं हा एक नाजूक, गुंतागुंतीचा विषय आहे. बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या जीवन आकळलेल्या कवयित्री म्हणतातऐक ऐक रे योग्या काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
सासुरवासाने त्रासलेल्या मुलीचा चार दिवस माहेरी सुखाचा अनुभव यावा यासाठी तिची आई सासुरवास सोसत राहते असे बहिणाबाई सुचवतात. याचबरोबर काहीजण गंमतीने सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नकोत अशाप्रकारे सांगताना दिसतात.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात सासरी छळ होऊन मरण पावलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या सुनांच्या बातम्या अनेकवेळा यायच्या. अगदी आजही अशा बातम्या वाचायला मिळतात.
या पार्श्वभूमीवर काही सासवांचे अनुभव अगदी अपवादात्मक असे चांगले आहेत. हे अनुभव ज्यांचे आहेत त्या दोन्ही सुना अभिनय, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील आहेत. महाराष्ट्रातील या अभिनेत्रींनी आपल्या कामाने जागतिक पातळीपर्यंत आपली ओळख उंचावली आहे.
(विजया मेहता यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
यातील पहिल्या आहेत विजया मेहता. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. विजया मेहता या मूळच्या विजया जयवंत. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. इब्राहीम अल्काझी यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शक, शिक्षकांकडे त्यांचे काही काळ शिक्षण झाले. हळूहळू त्यांचा जम अभिनय क्षेत्रात बसत गेला. त्यांचा पहिला विवाह जुन्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचे चिरंजीव हरीन यांच्याशी झाला. सासू सुना दोघीही अभिनय क्षेत्रातील. दुर्गाबाईंनी विजयाताईंच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला पाठिंबा दिला. घरच्या कामात त्या अडकून पडू नयेत यासाठी सगळ्या प्रकारची व्यवस्था केली. विजयाताईंची कारकीर्द यशस्वीपणे पुढे सुरू राहिली. हा संसार चालू असताना अचानकपणे हरीन यांचे निधन झाले. या कठीण काळात दुर्गाबाई ठामपणे विजयाताई यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पुढे विजयाताईंनी फरुख मेहता यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही दुर्गाबाईंनी पाठिंबा दिला. फरुख मेहता यांनी स्वतः तसेच त्यांच्या आई यांनीदेखील विजयाताई यांची कारकीर्द पुढे चालू राहण्यासाठी मदत केली. विजयाबाई यांनी आपल्या कारकिर्दीत रंगायनसारखी प्रयोगशील संस्था स्थापन केली. मराठी, हिंदी इंग्रजी नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी विक्रम गोखले, नाना पाटेकर यांसारख्या अनेक अभिनेत्यांना दिग्दर्शन केले. हे अभिनेते मोकळेपणाने विजयाबाईंचे ऋण मान्य करतात. फ्रिट्झ बेनेव्हिट या जर्मन दिग्दर्शकाबरोबर काम करत विजयाबाईंच्या कामाचा परीघ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला.

(रोहिणी हट्टंगडी यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
दुसऱ्या अभिनेत्री आहेत रोहिणी हट्टंगडी. रोहिणीताई म.ए.सो.रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल ( तेव्हाची मुलींचे भावे हायस्कूल) शाळेत असताना नृत्य शिकत होत्या. त्यांच्या शाळेतील कलाशिक्षक कृष्णराव मुळगुंद यांच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा नाटकात काम केले. रोहिणी हट्टंगडी यांचे वडील अनंतराव ओक हे पुण्यातील नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नाटकातही रोहिणीताईंनी काम करायला सुरुवात केली. अभिनय क्षेत्रातील व्यक्तिसांठी केंद्र सरकारने सुरू केलेली शिष्यवृत्ती मिळवून त्या दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एन.एस.डी.) येथे दाखल झाल्या. इब्राहीम अल्काझी तेथे प्रमुख होते. तेथेच जयदेव हट्टंगडी हेदेखील शिष्यवृत्ती मिळवून दाखल झाले होते. दोघांचेही अभिनयाचे शिक्षण एकत्र झाले. पुढे दोघे विवाहबंधनात अडकले. विवाहानंतर जयदेव यांच्या आईदेखील रोहिणीताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे रोहिणीताई आपल्या व्यावसायिक जीवनात कार्यरत राहू शकल्या. रिचर्ड ॲटनबरो यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर चित्रपटात रोहिणीताई यांची कस्तुरबा गांधी यांची भूमिका करण्यासाठी निवड केली. हा चित्रपट जागतिक पातळीवर यशस्वी ठरला. रोहिणीताईंचे काम जागतिक पातळीवर गेले.
विजयाबाई आणि रोहिणीताई यांनी आपल्या कारकिर्दीसाठी आपापल्या सासवांचे खूप पाठबळ मिळाले असे कृतज्ञपणे नमूद केले आहे. या सासवांमुळे दोघींनी आपला ठसा जागतिक पातळीपर्यंत उमटवला. हे या सासवांचे ऋण!
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments
Post a Comment