Posts

Showing posts from September, 2026

सर्वांगाने उत्तम 'संगीत आनंदमठ' नाटक

Image
        महायोगी श्री अरविंद यांनी 'वंदे मातरम्' ला भारत देशाचा महामंत्र म्हटले आहे. या महामंत्राने अनेक क्रांतिकारकांना फासावर जाण्याची प्रेरणा दिली तर अनेकांना देशासाठीच जगण्याची शिकवण दिली या गीताचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्थान अढळ आहे. हे गीत ज्यांना स्फुरले त्यांचा उल्लेख अरविंद यांनी ऋषी बंकिमचंद्र चटोपाध्याय असा केला आहे. ज्यांना ऋचांचे दर्शन झाले त्यांना ऋषी म्हटले गेले. याच ऋचांनी तयार झाले ते जगातील सर्वात जुने वाड्:मय. ते म्हणजे 'वेद'! ऋषी बंकिमचंद्र यांना असेच 'वंदे मातरम्' गीताचे दर्शन झाले. एका क्षणी भावना उचंबळून आल्या आणि या गीताचा जन्म झाला त्याचा दिनांक सांगितला जातो तो सात नोव्हेंबर १८७५ कार्तिक शुद्ध दशमी.                   ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी हे गीत जन्माला आले. ते प्रसिद्ध झाले ते नंतर १८८१-८२ मध्ये बंकिमचंद्र यांनी क्रमशः 'आनंद मठ' नावाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये. २०२५ मध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त अनेकांनी नवनवीन रचना केल्या, गीते लिहिली, लेख लि...