Posts

Showing posts from August, 2026

चुकवलेला वेध

Image
                                   (कथा)       सॅबेस्टियन नेहमीप्रमाणे इंटरनेटवर सर्फिंग करत होता. हॅकिंगची माहिती त्याला बरेच दिवसांपासून होती. त्यामुळे तो ठिकठिकाणी हॅकिंग करुन पाहिजे ती माहिती मिळवत असे. सध्या त्यांचं लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जास्त होतं. आपल्या देशात काय चाललं आहे त्यापेक्षा शेजारच्या देशात काय चाललं आहे याकडं तो जरा जास्त लक्ष ठेवून होता. कारणही तसंच होतं. 'रिपब्लिक ऑफ बॉंगो' हा त्याचा देश जगातील इतर देशांच्या तुलनेत अगदी लहानसा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणाच्या अध्यात मध्यात नसलेला त्याचा देश स्वत:च्याच प्रश्नात इतका गुंतला होता की आजूबाजूला लक्ष देण्यासारखी परिस्थितीही नव्हती आणि फुरसतही नव्हती. पण....               ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)        पण हे वर्ष होतं २०४९ चं. तंत्रज्ञानाची, व्यापाराची आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची गुंतागुंत इतकी वाढली होती ...

आता तशी वेळ येणार नाही!

Image
                             (कथा)         (ओढवलेली वेळ या कथेचा पुढचा भाग) ललिताबाई जवळपास अर्धा तास तशाच अवस्थेत बसून राहिल्या. नंतर हळूहळू विचारशक्ती काम करू लागली. त्यांना लक्षात आले की अजून दिनेशला फोन केला नाही. मग त्यांनी लगेच दिनेशला फोन लावला. अमेरिकेत अर्धी रात्र झाली होती. "काय गं आई?" झोपाळलेल्या स्वरात दिनेशने विचारले. ललिताबाई," बाबा....!" एवढाच शब्द उच्चारू शकल्या आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. दिनेश झोपेतून खडबडून जागा झाला. "आई..... आई......" असं म्हणत राहिला दोन पाच मिनिटांनी ललिताबाईंचे रडू जरा ओसरले आणि परिस्थितीचा खुलासा दिनेशला झाला. तोही हतबुद्ध झाला. हजारो किलोमीटरवरून अशा वेळी तो काय करू शकणार होता? तोही गप्प बसला‌. पण काही वेळाने त्याने विचारले, "आई, तो कोविडच्या काळात आपल्या गल्लीत तुम्हाला मदत करणारा कोण गं?" "संतोष!" ललिताबाई म्हणाल्या. "त्याला सांगून बघ. काहीतरी करेल तो." या दिनेशच्या बोलण्यावर "बघते." असं ललिताबाई म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला.   ...

ओढवलेली वेळ

Image
                         (कथा)        ललिताबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या. काय करावे काहीच सुचत नव्हते. वेळच तशी ओढवली होती. समोर भुजंगरावांचा अचेतन देह पडला होता. त्याचे अंत्यसंस्कार करायला आता कोण मदत करील या प्रश्नाचे उत्तर काही ललिताबाईंना मिळत नव्हते.               (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)    ललिताबाई आणि भुजंगराव यांचा संसार तब्बल चाळीस वर्षांचा. एका तालुक्याच्या गावात खाऊनपिऊन सुखी असलेला दोघांचा संसार. इतरांच्या मानाने तसा सुखवस्तूच. मुलगा दिनेश अगदी लहानपणापासून हुशार. शाळा महाविद्यालयात अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा. स्वाभाविकच या छोट्या गावात त्याला पाहिजे तसं शिक्षण नव्हतं. म्हणून शाळा संपली की पुढच्या शिक्षणासाठी तो जो पुण्याला गेला तो गावापासून लांबच राहत गेला. आधी पदवी मग अमेरिकेत पदवीनंतरचे शिक्षण मग यथावकाश अमेरिकेत नोकरी आणि अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले.       ...

कर्माचं ओझं

Image
                                        (कथा)      दारातून बाहेर पडलेल्या नर्सला बायजाबाईंनी उत्सुकतेने विचारलं, "पोरगा की पोरगी?" "पोरगा!" नर्सनं उत्तर दिलं.बायजाबाईंचा चेहरा एकदम उतरला. "मावशी, अहो पोरासाठी लोकं काय काय करत्यात! आनि सुनंला पोरगा झाला तर तुम्ही का तोंड पाडताय?" नर्सनं विचारलं. "जाऊ दे पोरी." एवढंच म्हणून बायजाबाई शांत बसल्या. जरा वेळ वाट बघून बक्षीसी मिळण्याची आशा सोडून नर्सही पुढच्या कामाला लागली.                  (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)       बसल्या बसल्या बायजाबाईला गेल्या वर्षीच्या वारीतला प्रसंग आठवू लागला. बायजाबाईंचं माहेर आणि सासर दोन्ही माळकरी. वारीची परंपरा पिढ्यानपिढ्या दोन्हीकडं चालत आलेली होती. घरात हरिपाठ रोज होत असे. गावातल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायणाच्या सोहळ्यात त्यांचं घर असायचं म्हणजे असायचंच. महिन्याची एकादशी कधी चुकली नाही. घरात माळकरी मंडळींची ...