Posts

Showing posts with the label नवस

आईने केलेला नवस फेडण्यासाठी

Image
   'फुलात फूल जाईचे जगात प्रेम आईचे' असा सुविचार पूर्वी अनेक शाळांच्या फळ्यांवर, भिंतीवर लिहिलेला आढळत असे. आईचे प्रेम ही जगातील एक अद्भुत गोष्ट आहे. आईने आपल्या अपत्याला नऊ महिने पोटात वाढवलेले असते. त्यासाठी अनेक शारीरिक मानसिक वेदना सहन केलेल्या असतात. याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्यामुळे आईचे प्रेम हे निरपेक्ष असते. अपत्य हा आईच्या जीवाचा शब्दशः एक अंश असतो. आईला म्हणून देवाचे रूप मानले जाते.  'प्रेम देण्यासाठी आई निर्मिली ,आई हे देवाचे रूप सर्वांठायी देव धावेल कसा, देवाला कामे ही खूप' असे गीत स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांनी गायलेले आहे.          आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करणारी आई अपत्याच्या सुखाने सुखावते आणि दु:खाने कष्टी होते. अपत्यावर संकट आले असेल तर ती ते संकट दूर करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. अनेक प्रकारच्या संकटांपैकी एक संकट असते ते आजारपणाचे. आजारपणावर वेगवेगळे उपचार करून जर ते दूर होत नसेल तर देवावर श्रद्धा असणारी माणसे आपल्या दैवताला नवस करतात आणि आजारपण संपले की तो नवस फेडतात. आईने केलेला नवस फेडणाऱ्या दोन प्रसिद्ध व...